शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओत महिलेची छेडछाड करताना दिसला सरकारी अधिकारी, पोलिसांना अटक करण्यासाठी लागले 12 दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 11:51 IST

Lucknow Crime News : याप्रकरणी पीडित महिलेने 29 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र आता 12 दिवसांनंतर आरोपी इच्छाराम यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

लखनऊ : लखनऊ सचिवालयात तैनात असलेल्या एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याची छेडछाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महिलेने स्वतः बनवला आहे. महिलेने अवर सचिव इच्छाराम यादव याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 29 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र आता 12 दिवसांनंतर आरोपी इच्छाराम यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या हुसैनगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारी पीडित महिला अल्पसंख्याक विभागात कंत्राटी पदावर कार्यरत आहे. पीडितेने अल्पसंख्याक कल्याण विभागातील सहाय्यक सचिव इच्छाराम यादव याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दरम्यान,  2018 पासून इच्छाराम यादव सतत छेडछाड करत असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

या सततच्या छेडछाडीला वैतागून पीडितेने आरोपी सचिव इच्छाराम यादव याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, इच्छाराम यादव हा महिलेची छेडछाड करताना दिसत आहेत आणि महिला स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत आहे. तसेच, विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेने हुसैनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 29 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या महिलेला दोन-तीन वेळा बोलावून तिचे म्हणणे नोंदवण्यात आले. दोन्ही बाजूंचे जे काही पुरावे असतील, त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती एडीसीपी सेंट्रल ख्याती गर्ग यांनी दिली  आहे. 

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी अवर सचिव इच्छाराम यादवला अटक केली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर 12 दिवसांनी ही अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश