शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:33 IST

एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.

ठळक मुद्देप्रियकराची प्रकृती गंभीर : गांधीबाग पार्क परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीने जहर ओकले, मात्र प्रियकराने ते घेतल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.पुण्याजवळ राहणारा ओमकार कुताड (वय २३) बीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची नागपुरातील एका तरुणीसोबत फेसबुकवरून फ्रेण्डशिप झाली. सलग संपर्कामुळे त्यांचे प्रेम फुलले. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. हिंमत करून त्याने तिचे घर गाठले आणि तिच्या कुटुंबीयांना तिचा हात मागितला. घरच्यांनी स्पष्ट नकार दिला. तो निराश होऊन परतला, मात्र त्यांचा ऑनलाईन संपर्क सुरू होता. दरम्यान, तिचे घरच्यांनी लग्न जुळविले. तिने हे दोन दिवसांपूर्वी त्याला कळविले. तो अस्वस्थ झाला. थेट नागपुरात पोहचला. मंगळवारी दुपारी हे दोघे गांधीबागमधील पार्कमध्ये भेटले. जीना मरना संग संग, अशी शपथ घेणाऱ्या या दोघांनी आपल्याला सोबत जगता येणार नाही, असा समज करून घेतला. त्यामुळे दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. विष घेताच ओकारी आल्यामुळे प्रेयसी बचावली. मात्र, विषाचा घोट घेतल्याने प्रियकर लगेच तडफडू लागला. त्याची ती अवस्था पाहून प्रेयसी जोरजोरात ओरडली. गार्डसह बाजूची मंडळी धावली. त्यांनी या दोघांना मेयोत पोहचवले. माहिती कळाल्यानंतर तहसील पोलीसही पोहचले. प्रियकराची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त लिहिताना पोलिसांकडून कळले.विष कुठून आणलेया दोघांना मृत्यूच्या जबड्यात पोहचविणारे विष कुणी आणि कुठून आणले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. विष घेण्याऐवजी ते पळून जाऊन लग्न करू शकले असते. त्यांनी तसे न करता आत्मघाताचा निर्णय का घेतला, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टnagpurनागपूर