शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड मंडपात पोहचणार इतक्यात नवऱ्याच्या मोबाईलवर फोटो आला अन् काही क्षणात सगळं फिस्कटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:09 IST

हमीरपूर जिल्ह्यातील मोहदा कोतवाली परिसरात एका गावात सोमवारी रात्री लग्नाच्या आनंदात विरजन पडलं.

ठळक मुद्देमुलीचं लग्न सदर कोतवाली येथील कुछेछा निवासी संजयसोबत निश्चित झालं होतं.नवरदेव आणि नवरी कडच्या सगळ्या मंडळींनी लग्नाची पूर्ण तयारी केली. घरात वऱ्हाडी मंडळींसाठी खाण्यापिण्याच्या वस्तूही आणल्या.आता मी माझ्या प्रियकरासोबतच लग्न करणार आहे. कारण त्याच्या कृत्यामुळे माझं लग्न मोडलं.

हमीरपूर – उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात ७ फेरे घेण्यापूर्वी होणाऱ्या नवरीचा अश्लिल फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर नवऱ्याने मध्येच लग्न रोखलं. त्यानंतर हातावर मेहंदी लावलेल्या नवरीनं आता कोतवाली पोलीस स्टेशनला पोहचून प्रियकरासोबत लग्न लावून देण्याच्या मागणीवर अडून राहिली आहे. पोलिसांनी मंगळवारी नवरीच्या तक्रारीवरून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हमीरपूर जिल्ह्यातील मोहदा कोतवाली परिसरात एका गावात सोमवारी रात्री लग्नाच्या आनंदात विरजन पडलं. लग्न न करताच वऱ्हाड माघारी फिराल्यानं नवरीच्या स्वप्नांचा चुराडा झाला. मुलीचं लग्न सदर कोतवाली येथील कुछेछा निवासी संजयसोबत निश्चित झालं होतं. नवरदेव आणि नवरी कडच्या सगळ्या मंडळींनी लग्नाची पूर्ण तयारी केली. घरात वऱ्हाडी मंडळींसाठी खाण्यापिण्याच्या वस्तूही आणल्या. अशातच अचानक नवरदेवाने मुलीकडच्या कुटुंबीयांन वऱ्हाड घेऊन येणार नाही असा निरोप दिला.

त्यानंतर नवरी थेट कोतवाली पोलीस स्टेशनला पोहचली आणि लग्न मोडल्याचं कारण समजताच प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. नवरी म्हणाली की, आता मी माझ्या प्रियकरासोबतच लग्न करणार आहे. कारण त्याच्या कृत्यामुळे माझं लग्न मोडलं. तर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून यातील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

शंभूनगर क्योटरा येथील विजयचं मौदहा कोतवाली येथील एका गावातील मुलीसोबत मागील ५ वर्षापासून अफेअर होतं. लग्नाचं आमिष दाखवून त्याने मुलीसोबत अश्लिल फोटो आणि व्हिडीओ बनवले. ज्यावेळी लग्नाचा विषय आला तेव्हा प्रियकरानं नकार दिला त्याचसोबत संपूर्ण कुटुंबाला लग्नाचा विषय काढला तर जीवे मारू अशी धमकी दिली होती.

त्यानंतर कुटुंबाने मुलीचं लग्न पारगावातील संजयसोबत ठरवलं. सोमवारी वऱ्हाड येणार होतं. परंतु त्याआधीच नवऱ्याच्या मोबाईलवर नवरीमुलीचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यात आले. लग्नापूर्वी मुलीचे असे संबंध पाहून नवऱ्या संजयने वऱ्हाड घेऊन जाण्यास नकार दिला आणि ते लग्न मोडलं.

टॅग्स :Policeपोलिसmarriageलग्न