शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून बॉयफ्रेंडची उडाली तारांबळ; चक्क पाचव्या मजल्यावरून घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 22:00 IST

Lover Mohsin jumped from 5th floor : नैनितालमध्ये राहणाऱ्या २४ वर्षांच्या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र, तरीही तिचं मोहसिन उर्फ आजमसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन दुसऱ्या शहरात एकत्र राहण्याचे ठरवले.

जयपूर - गर्लफ्रेंडचा पती अचानक घरी आल्याचे पाहून घाबरलेल्या बॉयफ्रेंडने पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांपासून हे कपल एकमेकांसोबत राहत होतं. लग्न झालेल्या प्रेयसीला तिच्या प्रियकराने पळवून आणलं होतं आणि एका भाड्याच्या खोलीत दोघं राहत होते. मात्र पत्नीचा शोध घेऊन पती तिथं पोहोचला आणि प्रियकर सैरावर झाला. 

नैनितालमध्ये राहणाऱ्या २४ वर्षांच्या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र, तरीही तिचं मोहसिन उर्फ आजमसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन दुसऱ्या शहरात एकत्र राहण्याचे ठरवले. त्यानुसार एक दिवस दोघंही आपापल्या घरातून बाहेर पडले आणि जयपूरला आले. जयपूरमध्ये एका इमारतीत फ्लॅट भाड्यानं घेत दोघं तिथं राहू लागले. इथे राहणाऱ्या इतर लोकांना हे दोघं पती-पत्नी असल्याचं वाटत होतं. नैनितालपासून इतक्या दूरवर आणि तेही  वेगळ्या राज्यात आपल्याला शोधायला कुणी येणार नाही, असं त्या जोडप्याला वाटत होते. मात्र विवाहित तरुणीच्या पतीनं आपल्या पत्नीचा शोध घेतला. 

आपली पत्नी जयपूरमध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची माहिती पतीला समजल्यानंतर खरं काय ते जाणून घेण्यासाठी त्याने तिचं घर शोधून तिला भेटायचं ठरवले. तिचा पत्ता मिळवून तो पत्नीच्या घरी पोहोचला. यावेळी त्याची पत्नी आणि मोहसीन दोघंही घरात होते. डोअर बेल वाजल्यानंतर पत्नीनं दार उघडलं आणि आपल्या पतीला समोर पाहून तिला जबरदस्त धक्काच बसला. नंतर तिच्यापेक्षाही मोहसीनला याचा मोठा धक्का बसला. आपल्या गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून तो इतका घाबरला की त्याने पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. 

या घटनेनंतर महिलेच्या पतीने तात्काळ तिथून पळ काढला. दुसरीकडे महिला मोहसीनला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर ती देखील घाबरली आणि तिनेही तिथून काढता पाय घेतला. सध्या पती आणि पत्नी फरार आहेत. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस