शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकर अन् प्रेयसीला कुऱ्हाडीने सपासप कापले; असहाय्य आई बाप खिडकीतून राहिले पाहत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 16:33 IST

Father kills daughter and her lover with axe : सपना आणि कल्लूच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांसह गावात चर्चेचा विषय बनली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वाद-विवाद झाले होते.

ठळक मुद्देघटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

कानपूर - कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी आपल्या भावांसोबत मिळून अल्पवयीन मुलीसह तिच्या प्रियकराला कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या हत्येनंतर आरोपी मृतदेहांजवळ बसला आणि पोलीस येण्यापूर्वीच आरोपीचा भाऊ फरार झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

शिव आसरे हा घाटमपूर कोतवाली परिसरातील बिरहिणपूर गावात राहणारा ट्रक चालक आहे. कुटुंबात एक पत्नी आणि चार मुलं होती, ज्यात सपना (१६) नावाची मोठी मुलगी होती. सपनाचे शेजारी राहणारे बैजनाथचा मुलगा कल्लू (१७) याच्याशी प्रेमसंबंध होते. सपना आणि कल्लू एकत्र शाळेत असताना त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु झाले. सपना आणि कल्लूच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांसह गावात चर्चेचा विषय बनली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वाद-विवाद झाले होते.

मुलीचे वडील लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी गेले होते

गेल्या गुरुवारी भावाच्या लग्नाला शिवआसरे आपली पत्नी व दोन मुलांसह बांदा येथील बरुआ गावी गेले होते. सपना लहान भावासोबत घरी एकटी होती. शुक्रवारी उशिरा रात्री १ वाजण्याच्या सुमारास कल्लू सपनाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. याची माहिती सपनाच्या काकांना मिळाला. काकांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावून शिवआसरे यांना याबाबत माहिती दिली .त्याच दिवशी शिवआसरे म्हणजेच मुलीचे वडील शिवा बांदा येथून भाटमपूरला रवाना झाले. शनिवारी सकाळी शिवआसरे घरी पोचले. आरोपीने आपल्या भाऊ अमसरे व दीपक यांच्यासह मुलगी व तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने हत्या केली.कल्लूचे कुटुंब खिडकीतून पाहत राहिले

कल्लू हा कुटूंबातील एकुलता एक मुलगा होता. शिवआसरे हे आपल्या भावांसोबत ही क्रूर घटना घडवून आणत होते. प्रियकराचे आईवडील खिडकीतून असहाय्य होऊन पाहत होते आणि मुलाच्या जीवाची भीक मागत होते. घराला कुलूप असल्याने ते आत जाऊ शकले नाहीत. दोघेही डोळ्यासमोर मारले गेले. घाटमपूर कोतवाल धनेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टसाठी पाठवले जात आहेत. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक