“लव यू मम्मी-पप्पा, तुमची मुलगी बनून परत येईन”; सुसाइड नोट लिहून घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:03 IST2022-02-11T20:03:34+5:302022-02-11T20:03:58+5:30
दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या इटावा इथं १२ वीच्या क्लामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं नदीत जीव देत आत्महत्या केली आहे.

“लव यू मम्मी-पप्पा, तुमची मुलगी बनून परत येईन”; सुसाइड नोट लिहून घेतला गळफास
फतेहाबाद – हरियाणाच्या फतेहाबादमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. शहरातील नहर कॉलनीत राहणाऱ्या २५ वर्षीय युवतीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. युवतीनं सुसाइड करण्यापूर्वी आई वडिलांसाठी घराच्या भितींवर एक भावूक संदेश लिहिला होता. या युवतीनं आत्महत्या का केली? याबाबत अद्याप पुष्टी नाही.
युवतीनं आत्महत्येपूर्वी तिच्या खोलीच्या भिंतीवर लिहिलं होतं की, मी माझ्या मृत्यूसाठी स्वत: जबाबदार आहे. यात कुणाचा काहीही संबंध नाही. मी माझ्या मर्जीनं गळफास घेतेय. सर्वांनी काळजी घ्या. आई-पप्पा रडू नका. मी पुन्हा परत येईन. तुमचीच मुलगी होईन. लव यू मम्मी पप्पा. फतेहाबादच्या शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र सिंहनुसार, मृतदेह पोस्टमोर्टमसाठी देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. युवतीनं हे टोकाचं पाऊल का उचचलं याची चौकशी सुरु आहे.
इटावाच्या १२ वी विद्यार्थ्यांनीने केली आत्महत्या
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या इटावा इथं १२ वीच्या क्लामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं नदीत जीव देत आत्महत्या केली आहे. विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट बनवले. त्यात तिचा फोटो आणि फोन नंबर दिला होता. लोकांनी या मुलीला अश्लिल कमेंट पाठवणं सुरु केले. त्यामुळे त्रस्त होत मुलीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी यमुना नदीतून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला होता.