शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, गर्भपात आणि खून; जंगलात आढळला सांगाडा, पोलिसांनी असा लावला प्रकरणाचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 21:05 IST

13 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा झाला आहे.

रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये 27 दिवसांपूर्वी सापडलेल्या सांगाड्याचा खुलासा झाला आहे. हा सांगाडा बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यालाही अटक केली आहे. चौकशीत त्याने सांगितले की, प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला होता, त्यामुळेच कंटाळून त्याने आधी तिची हत्या केली आणि त्यानंतर जंगलात नेऊन मृतदेह जाळला. पोलिसांनी 52 दिवसांनंतर खुनाचा छडा लावला.

ही घटना ओरमांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उक्रीड डोंगरातील आहे. 27 फेब्रुवारी रोजी सापडलेला सांगाडा रश्मी मुंडा (22) नावाच्या तरुणीचा असून, ती चुटिया पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव टोली येथील रहिवासी होती. ती 13 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती आणि तिच्या कुटुंबीयांनी 14 फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सतत तपास सुरू ठेवला. मात्र, पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही. मुलीच्या घरच्यांना तिच्या खोलीत मुलीची डायरी सापडली. डायरीच्या पानांमध्‍ये एक स्लिप दिसली, ती पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. 

गर्भपाताच्या स्लिपने मारेकरी पकडलारश्मीच्या कुटुंबीयांना गर्भपाताची स्लिप सापडली. ती स्लिप घेऊन कुटुंबीय तात्काळ चुटिया पोलिस स्टेशनचे प्रभारी व्यंकटेश कुमार यांच्याकडे पोहोचले. पोलिसांनी तातडीने नर्सिंग होम गाठून या प्रकरणाचा तपास केला. ज्यामध्ये मृत रश्मीचा प्रियकर पंकज महतोचा पर्दाफाश झाला. 13 फेब्रुवारीला रश्मी त्याच्याकडे आली होती आणि त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह करू लागली. समज देऊनही ती घरी परतण्यास तयार नव्हती. रात्री दोघांमध्ये भांडण झाले आणि आरोपीने जड वस्तूने रश्मीचा डोक्यात वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तिला गोणीत भरुन तो जंगलात गेला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना पेट्रोल ओतून तिला जाळले. प्रेमप्रकरणात ती गरोदर राहिल्याचेही त्याने सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस