शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधी मुलीला जबरदस्ती घरच्यांकडे सोपवलं मग हत्येनंतर केली मदत; पोलीस अधिकाऱ्याचे हादरवणारं कृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:58 IST

आंध्र प्रदेश कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने वडिलांनी मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Andhra Pradesh Honor Killing: आंध्र प्रदेशातील माचेरला शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केले म्हणून एका २२ वर्षीय तरुणीची तिच्याच घरच्यांनी उशीने तोंड दाबून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, या ऑनर किलिंगच्या गुन्ह्यात एका पोलीस निरीक्षकाने लाच घेऊन पालकांना मदत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नेमके प्रकरण काय?

मयत तरुणीचे नाव चौदेश्वरी असून तिचे एका तरुणावर प्रेम होते. मात्र, तिच्या घरच्यांचा या लग्नाला कडाडून विरोध होता. ४ मार्च रोजी चौदेश्वरीने घर सोडले आणि आपल्या प्रियकराशी विवाह केला. यानंतर संतापलेल्या घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.

पोलीस निरीक्षकाची मदत

माचेरला टाऊनच्या सर्कल इन्स्पेक्टरने १५ मार्च रोजी या जोडप्याचा शोध लावला. नियमानुसार सज्ञान असलेल्या तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध घरी पाठवता येत नाही, तरीही संबंधित पोलीस अधिकाऱ्याने चौदेश्वरीला धमकावून जबरदस्तीने तिच्या पालकांकडे सोपवले.

झोपेतच केली हत्या

पालकांच्या घरी परतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत, चौदेश्वरीचा संशयास्पद मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टने या खोट्या दाव्याचा पर्दाफाश केला. झोपेत असताना उशीने तोंड दाबून श्वास रोखल्यामुळे चौदेश्वरीचा मृत्यू झाला आहे, असे डॉक्टरांनी अहवालात स्पष्ट केले. हा अहवाल समोर येताच पोलिसांनी तपास चक्रे फिरवून चौदेश्वरीचे वडील चंद्रश्रीनु आणि एका नातेवाईकाला बेड्या ठोकल्या आहेत.

लाच घेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अधिकारी असलेल्या सर्कल इन्स्पेक्टरनेही मदत केली. तपासात समोर आले की, या पोलीस अधिकाऱ्याने तरुणीच्या पालकांकडून मोठी लाच घेऊन या खुनाला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आता संबंधित कुटुंबाच्या बँक खात्यांची आणि अलीकडेच काढलेल्या मोठ्या रकमेची चौकशी सुरू केली आहे.

पोलीस महासंचालकांकडून कठोर कारवाई

पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या प्रकाराची दखल घेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जर या अधिकाऱ्यावरील लाचखोरी, गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप सिद्ध झाले, तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Andhra Pradesh: Honor killing, police helped parents after forcing girl home.

Web Summary : Andhra Pradesh honor killing: Parents murdered their daughter for marrying her lover. A police inspector helped cover it up by taking a bribe and forcing her return home. He's suspended, facing charges.
टॅग्स :Honor Killingऑनर किलिंगCrime Newsगुन्हेगारीAndhra Pradeshआंध्र प्रदेश