शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Love Jihad: धक्कादायक! IAS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत 'लव्ह जिहाद'! उकळत्या तेलानं चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 09:09 IST

सारंगी म्हणाले, आरोपी अब्दुलने कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी नोव्हेंबर 2018 मध्ये मंदिरात आपल्या मुलीसोबत लग्न केले अन्...

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत लव्ह जिहादची (Love Jihad) घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'एका व्यक्तीने आपल्या एकुलत्या एक मुलीला षड्यंत्र करून फसवले आणि तिच्याशी विवाह केला,' असा खळबळजनक आरोप दिल्लीतील IAS अधिकारी के. सारंगी (IAS K. Sarangi) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी गाझियाबाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (IAS Officer Daughter Love Jihad)

MBBS आहे मुलगी - IAS अधिकारी सारंगी यांनी म्हटल्यानुसार, त्यांची एकुलती एक मुलगी डॉ. हर्ष भारती सारंगी 2016 मध्ये युक्रेनमधून एमबीबीएसचे शिक्षण घेऊन परतली होती. तेव्हापासून मेरठमधील मवाना येथे राहणारा अब्दुल रहमान हा आपल्या मुलीमागे पडला होता. त्याने कट रचून आपल्या मुलीची फसवणूक केली. त्याचा उद्देश मुलीचे धर्मांतर करणे आहे. महत्वाचे म्हणजे, लग्न लावून देणाऱ्या दोन संस्थांचाही या कटात सहभाग आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'उकळत्या तेलाने चेहरा जाळण्याचा प्रयत्न' -सारंगी यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे, की संबंधित व्यक्तीने कट रचून आपल्या मुलीला फसवले. त्याने सर्वप्रथम आपल्या मुलिला सहानुभूती दाखवली. यानंतर तो दबाव टाकून तिला आपल्यासोबत ठेवू लागला. या संपूर्ण घटनेत मौलाना लोकांनीही त्याला मदत केली. एवढेच नाही, तर त्याने उकळत्या तेलाने मुलीचा चेहरा जाळण्याचाही प्रयत्नही केला होता. जेणेकरून तिच्याकडे अब्दुल सोबत लग्न करण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहणार नाही, असा धक्कादायक आरोपही सारंगी यांनी केला आहे.

कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी मंदिरात रजिस्ट्रेशन -सारंगी म्हणाले, आरोपी अब्दुलने कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी नोव्हेंबर 2018 मध्ये मंदिरात आपल्या मुलीसोबत लग्न केले आणि सध्या दोघेही नोएडा येथे राहत असल्याचे सांगितले. सारंगी यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अब्दुल रहमान, वैदिक हिंदू सभा, गाझियाबादमधील पदाधिकारी, आर्य समाज मंदिर ट्रस्ट आणि दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

यासंदर्भात, पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू करत दोन्ही ठिकाणच्या पदाअधिकाऱ्यांकडून उत्तर मागवण्यात आले आहे. गाझियाबादचे पोलीस कॅप्टन मुनीराज यांनी सांगितल्यानुसार, आयपीसीच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाने आपल्या मुलीसोबत, फसवणूक करून लग्न केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून मुलगी आणि मुलांच्या चौकशीनंतर जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली