शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखाचा ऐवज लुटला; तीन संशयित सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 13:47 IST

Dacoity : जळगावात पहाटे दरोडा 

ठळक मुद्देबुधवारी पहाटे ३.१५ ते ४ या वेळेत तब्बल ४५ मिनिटे हा थरार सुरु होता. दरम्यान, या तीन दरोडेखोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.

जळगाव : चाकूसारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून पिंटू बंडू इटकर (३५) या व्यापाऱ्याच्या घरातून २० लाखाचे दागिने व ३ लाख रुपये रोख असा २३ लाखाचा ऐवज लुटून नेल्याची थराराक घटना बुधवारी पहाटे ३.१५ ते ४ या वेळेत जळगावातील मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात घडली. बुधवारी पहाटे ३.१५ ते ४ या वेळेत तब्बल ४५ मिनिटे हा थरार सुरु होता. दरम्यान, या तीन दरोडेखोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.

मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात पिंटू बंडू इटकर यांचा अलिशान बंगला आहे. त्यात ते पत्नी मनिषा व मुलगी हरिप्रिया (वय ३) यांच्यासह वास्तव्याला आहेत.इटकर हे स्टीलचे होलसेल व्यापारी आहेत. मंगळवारी रात्री घरात ते पत्नी व मुलगी असे तिघंच होते. मु‌ख्य प्रवेशद्वारावरुन उडी घेऊन दरोडेखोर बंगल्यात शिरले. वरच्या मजल्यावर आल्यावर त्यांनी झोपलेल्या दाम्पत्याला उठविले व एकाने गळ्याला शस्त्र लावून जीव प्यार आहे ना असे धमकावत घरातील रोकड व दागिने काढायला लावले. सर्व जणांनी अंगात स्वेटर व तोंडाला रुमाल बांधलेला होता तर एकाने काळ्या रंगाचे जोकर मास्क लावलेले होते. सर्व जण मराठी अर्थात खास करुन जळगाव जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा बोलत होते. कपाटाच्या ड्रावरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये रोख व कपाटात ठेवलेले २० लाखाचे सोन्याचे दागिने काढून पिशवीत टाकले. जातांना दोघांजवळील मोबाईल हिसकावून घेत घरातून पळ काढला. जातांना मोबाईल खाली लोखंडी गेटजवळ ठेवले होते.

दरोडेखोर २५ ते ३५ वयोगटातीलपिंटू इटकर यांच्या बंगल्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यातील एका कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून दरोडेखोरांनी नेलेला आहे तर दुसऱ्या एका कॅमेऱ्यात तीन जण कैद झालेले आहेत. लोखंडी गेटवरुन उडी घेऊन आतमध्ये येतांना व वरच्या मजल्यावर जातांना स्पष्टपणे दिसून येत आहे. सर्वांचे वय साधारण २५ ते ३५ वयोगटातीलच आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इटकर दाम्पत्याला धीर दिला.

टॅग्स :DacoityदरोडाJalgaonजळगावPoliceपोलिसRobberyचोरीcctvसीसीटीव्ही