शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
4
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
5
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
6
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
7
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
8
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
9
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
10
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
11
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
12
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
13
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
14
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
15
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
16
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
17
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
18
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
19
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
20
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले

लॉकडाऊनने घेतले पुन्हा दोन बळी, तरुणाचा गळफास घेऊन तर वृद्धाने रेल्वेखाली केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 14:00 IST

या नैराश्यातच त्याने जीवनाला कंटाळल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने तणावात आलेल्या रितेष उर्फ राजू सुरेश पाटील (२३, रा.वडली, ता.जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन तर लहू कौतिक पाटील (७०, रा.लोणवाडी, ता.जळगाव) या वृध्दाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याच्या घटना बुधवारी उघडकीस आल्या.लोणवाडी येथील लहू कौतिक पाटील (७०) या वृध्दाने मंगळवारी सकाळीच घर सोडले. संध्याकाळी पाच वाजता म्हसावद-बोरनार शिवारातील लोहमार्गावरील रुळावर त्यांचा एक धड नसलेला मृतदेह आढळून आला.

जळगाव : कोरोनाचा जगभर कहर सुरु असल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्याने सामान्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून हाताला काम नसल्याच्या नैराश्यात जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने तणावात आलेल्या रितेष उर्फ राजू सुरेश पाटील (२३, रा.वडली, ता.जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन तर लहू कौतिक पाटील (७०, रा.लोणवाडी, ता.जळगाव) या वृध्दाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याच्या घटना बुधवारी उघडकीस आल्या. याच महिन्यात याआधी लॉकडाऊनमुळे पाच जणांनी जीवन संपविले आहे.मंदिराच्या मागे झाडाला घेतली गळफासवडली, ता.जळगाव येथे रितेष उर्फ राजू याने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या देवराम महाराज मंदिराच्या मागे निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. राजू हा वाहन चालक होता. ट्रॅक्टर, चारचाकी कार, मालवाहू वाहनांवर रोजंदारीने तो कामाला जात होता. मात्र, तीन महिन्यापासून लॉकडाऊन लागू झाल्याने हे काम बंद झाले. कधी तरी अधूनमधून काम मिळत होते. कायमस्वरुपी रोजगार नाही, आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची. वडील व मोठ्या भावाचेही काम थांबले होते. या नैराश्यातच त्याने जीवनाला कंटाळल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.धावत्या रेल्वेखाली झोकून वृध्दाने केली आत्महत्या लोणवाडी येथील लहू कौतिक पाटील (७०) या वृध्दाने मंगळवारी सकाळीच घर सोडले. संध्याकाळी पाच वाजता म्हसावद-बोरनार शिवारातील लोहमार्गावरील रुळावर त्यांचा एक धड नसलेला मृतदेह आढळून आला. मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर झोकून देत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. लहू पाटील यांची परिस्थिती देखील जेमतेम होती. मुलगा अनिल हा सुरत येथे परिवारासह रहात होता. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने मुलगा परिवारासह घरी आला होता तर मोठा मुलगा भाऊसाहेब हा सासरवाडीला खांडवा, ता.मोताळा, जि.बुलडाणा येथे वास्तव्याला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

 

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसJalgaonजळगाव