शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये धारावीतून कल्याणपर्यंत प्रवास करणं पडलं महागात, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 13:48 IST

भारतात कोरोना साथीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून ३ मे पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी जाहीर केलेली आहे.

ठळक मुद्देधारावीतून बाईकवर अटाळी- आंबिवलीपर्यंत प्रवास करणाऱ्या दोघांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलया इसमाला आणि महिलेला क्‍वारंटाईन कक्षात ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

सचिन सागरेकल्याण  : कोरोनाच्याबाबतीत मुंबईतील अतिसंवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या धारावीतून बाईकवर अटाळी- आंबिवलीपर्यंत प्रवास करणाऱ्या दोघांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

भारतात कोरोना साथीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून ३ मे पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी जाहीर केलेली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीस वाहनांने प्रवास करण्यात मनाई करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनीदेखील कोरोना कंटेनमेंट झोनमधील नागरिक इतर भागात गेल्याचे आढळून आल्यास त्यांना महापालिकेच्या क्‍वारंटाईन कक्षात दाखल करून १४ दिवस ठेवणेबाबत निर्देश दिलेले आहेत.त्यानंतरही डोंबिवली येथे राहणाऱ्या आणि धारावी येथे काम करणाऱ्या एका इसमाने धारावीसारख्या कोव्हिड अतिसंवेदनशील भागातून एका महिलेला दुचाकीवरून अटाळी-आंबिवली येथे आणून सोडले. या इसमाने कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न करता धारावी- मुंबई ते अटाळी-आंबिवली असा प्रवास करून संचारबंदीचे उल्लंघन केल्याने दोन्ही व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अनुषंगाने भंग केल्यामुळे कोव्हिड-१९ उपाययोजना २०२० नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता (५४ ऑफ १८६०) कलम १८८,२६९,२७० व साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ चे कलम २,३ आणि ४ अन्वये खडकपाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. तसेच या इसमाला आणि महिलेला क्‍वारंटाईन कक्षात ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणbikeबाईकPoliceपोलिस