शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

लोकलच्या मोटरमन फेकली मसाला पावडर; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 20:31 IST

ही घटना शनिवारी रात्री ९.२० मिनिटांनी घडली. 

ठळक मुद्दे रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही तपासणी सुरु करण्यात आली आहे.डोळ्यांची आग होऊ लागली आणि समोर काही मीना यांना दिसत नव्हते म्हणून त्यांनी आपत्कालीन ब्रेक दाबले.

 मुंबई - हार्बर लाईनवर लोकलचे मोटरमन नवल किशोर मीना ट्रेन चालवत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोळ्यांत पनीर ग्रेव्ही मसाला पावडर फेकली. मीना यांना लोकलचे आपत्कालीन ब्रेक दाबावे लागले. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही तपासणी सुरु करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री ९.२० मिनिटांनी घडली. 

मीना हे बेलापूरहून निघणारी लोकल चालवत होते. लोकल गोवंडी स्थानकातून पुढे निघाली त्या दरम्यान एक अर्धे उघडलेले पनीर बटर मसाला पावडरचे पाकिट कुणी अज्ञात व्यक्ती मीना यांच्या तोंडावर फेकले. डोळ्यांची आग होऊ लागली आणि समोर काही मीना यांना दिसत नव्हते म्हणून त्यांनी आपत्कालीन ब्रेक दाबले. जवळ असलेल्या पाण्याने त्यांनी डोळे धुतले आणि पुढील मानखुर्द स्थानकावर मदत मागवली. मीना यांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधला. पुढच्याच रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर थंड पाण्याचा जग घेऊन वाट पाहात होते. मीना यांना पनवेलच्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले. या घटनेचा तपास सुरू आहे. रेल्वे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. एका इसमाला हे पाकिट फेकताना पाहिलं असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार संशयिताचं रेखाचित्र रेखाटण्यात आलं आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेlocalलोकलPoliceपोलिस