आमदाराच्या पीएला जीवे मारण्याची धमकी; स्थानिक गुंडांचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:39 AM2018-10-11T01:39:45+5:302018-10-11T01:41:46+5:30

अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागात आमदार वारीस पठाण यांचे स्वीय साहाय्यक अहमद अन्सारी यांना स्थानिक गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

local goons threats to kill of MLAs PA | आमदाराच्या पीएला जीवे मारण्याची धमकी; स्थानिक गुंडांचा प्रताप

आमदाराच्या पीएला जीवे मारण्याची धमकी; स्थानिक गुंडांचा प्रताप

Next

मुंबई : अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागात आमदार वारीस पठाण यांचे स्वीय साहाय्यक अहमद अन्सारी यांना स्थानिक गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भायखळा पोलिसांनी या प्रकरणी धमकाविल्याचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
भायखळा परिसरात अहमद अन्सारी (४२) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांच्याकडे स्वीय साहाय्यक म्हणून नोकरी करतात. भायखळा पूर्वेकडील ई. एस. पाटणवाला रोड परिसरात बांधकाम व्यावसायिक इस्लाम कुरेशी, जमील कुरेशी आणि मुनाफ वडगामा यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची लेखी तक्रार काही दिवसांपूर्वी पठाण यांच्याकडे आली होती. त्यानुसार, पठाण यांच्या सांगण्यावरून अन्सारी यांनी याबाबत पालिकेत तक्रार दिली.
याच दरम्यान, २९ सप्टेंबरला त्यांना समीर नावाच्या व्यक्तीने फोन केला व भेटायचे असल्याचे सांगितले. काही वेळातच समीर परब आणि त्याचा साथीदार सुलतान तेथे धडकला.
‘आप हमारी बिल्डिंग पर जो कारवाई करना चाह रहे हो, वो बिल्डिंग किसकी है, वो आपको मालुम नही. जो मालीक है, वो अमरिका में बैठा है, तुमको मालुम नही हम क्या कर सकते है?’ असे धमकावण्यास सुरुवात केली. तसेच या इमारतीच्या प्रकल्पासाठी अनेक भार्इंचे पैसे लागल्याचे सांगून, अन्सारीला धमकावले. तक्रार मागे नाही घेतली, तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली; आणि दोघेही दुचाकीवरून निघून गेले.
या घटनेमुळे अन्सारी यांना धक्का बसला असून, त्यांनी कार्यालयात जाणे टाळले. सोमवारी त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली.

पोलीस तपास सुरू
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास सुरू असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी दिली.

Web Title: local goons threats to kill of MLAs PA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.