शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

भीतीपोटी राहत होता जंगलात, 3 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलीस आले टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 21:46 IST

Deadbody Found : हा मृतदेह हिस्ट्रीशीटर चोरटा असल्याची ओळख पटली असून तो पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतात, जंगलात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रतलाम : जिल्ह्यात एका दिवसापूर्वी मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. तो मृतदेह तीन दिवसांपेक्षा जुना असल्याचे सांगण्यात आले. मृतदेहाचे जनावरांनी लचके तोडले होते, त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. पोलिसांना मृतदेह जिल्हा रुग्णालयात न्यावा लागला. यानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा मृतदेह हिस्ट्रीशीटर चोरटा असल्याची ओळख पटली असून तो पोलिसांपासून वाचण्यासाठी शेतात, जंगलात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.कुटुंबातील सदस्यांनी ओळखलेप्रत्यक्षात बुधवारी रोला गावाजवळ एक मृतदेह आढळून आला. ज्याला जनावरांनी खाल्लं होतं. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मृतदेह दशरथचा असून तो रोला गावातील रहिवासी असल्याचे आढळून आले. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.पोलिसांच्या भीतीने कुटुंबापासून दूर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर रोला गावातील मयत दशरथ याच्यावर प्राणघातक हल्ला, चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. काही प्रकरणांमध्ये त्यांनी शिक्षाही भोगली होती, मात्र काही प्रकरणे प्रलंबित होती. मृताची बहीण रेश्मा हिने सांगितले की, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. बराच काळ पोलिसांपासून वाचण्यासाठी तो कुटुंबापासून दूर शेतात किंवा इतर ठिकाणी राहत होता.पीएम रिपोर्टवरून मृत्यूचे कारण स्पष्ट होईलएक दिवसापूर्वी सापडलेला गुंड दशरथचा मृतदेह ३ दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंगनोडचे एसआय सत्येंद्र रघुवंशी यांनी सांगितले की, दशरथचा मृत्यू आत्महत्या की अपघात, याचे कारण स्पष्ट झाले नाही. आम्ही शवविच्छेदन केले आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसforestजंगल