शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फाशीऐवजी जन्मठेप! बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाची फाशी उच्च न्यायालयाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 21:20 IST

Life imprisonment instead of hanging : आरोपीने मित्रासमोर दिलेली घटनेची कबुली व इतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले.

मुंबई : ठाणे येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चौहान यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मोहम्मद आबेद मोहम्मद अजमेर शेख, असे आरोपीचे नाव आहे. भिवंडी येथील भोईवाडा येथे १ एप्रिल २०१८ रोजी ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी खेळण्यासाठी गेली व ती घरी परतलीच नाही. अखेर दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पोलिसांत याची तक्रार दिली. ४ एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.

मात्र आरोपी फरार होते. त्याने फरार होण्याआधी मित्राला घटनेबाबत सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश येथून अटक केली. आरोपीने मित्रासमोर दिलेली घटनेची कबुली व इतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. ते ग्राह्य धरत सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारी पक्षाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. न्यायालयाने हे प्रकरण विरळातील विरळ नसल्याचा निष्कर्ष नोंदवला.मेणबत्तीला ठेचले : प्रकाशमान होण्याआधीच थडग्याच्या दगडाने मेणबत्तीला ठेचले, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने यावेळी नोंदवले. कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहावरही न्यायालयाने दु:ख व्यक्त केले. आईवडील हे लाडाने मुलीचे संगाेपन करतात. अशा वेळी कुजलेला मृतदेह बघायला मिळणे यासारखे दुसरे दु:ख नाही, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळthaneठाणेbhiwandiभिवंडीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालयLife Imprisonmentजन्मठेप