शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

झारखंड येथील एका युवकाच्या खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 21:58 IST

वर्षभरापूर्वी गोव्यातील वाडी - बाणावली येथे घडली होती खूनाची घटना

मडगाव- झारखंड राज्यातील एका युवकाच्या खून प्रकरणात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविताना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निवाडा दिला. न्यायाधीक्ष एडगर फर्नाडीस यांनी आज मंगळवारी आरोपी दुलार मुंडा (47) याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये दोषी ठरविताना वरील शिक्षा फर्माविली. एक वर्षापूर्वी दक्षिण गोव्यातील वाडी - बाणावली येथे खुनाची ही घटना घडली होती. मूळ झारखंड येथील सचिन ओरांव या अठठावीस वर्षीय युवकाचा त्याचाच सहकारी दुलार याने दंडुक्याने मारहाण करुन त्याचा खून केला होता.

सरकारपक्षातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या खून खटल्याची बाजू मांडताना एकूण 14 साक्षिदार तपासले होते. आरोपीला जन्मठेपेशिवाय दहा हजार रुपये दंड व तो न भरल्यास तीन महिन्याची साध्या कैदेची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली आहे.

12 फेब्रुवारी 2017 साली रात्री आठच्या दरम्यान खुनाची ही घटना घडली होती. आरोपी दुलार मुंडा हा ही झारखंड राज्यातील असून, ते दोघेही वाडी - बाणावली येथील समुद्र किना:यावर असलेल्या पेद्रो बारमध्ये वेटर म्हणून कामाला होते. खुनाच्या घटनेच्या दिवशी रात्री मयत सचिन ओरांव याने पेद्रो बारमधील विनयकुमार सिंग व तिलकराज या दोन कामगारांना बेदम मारहाण केली होती. नंतर तो पळून गेला होता. दुलार मुंडा याने सचिनला या मारहाणीबददल जाब विचारला होता. नंतर दोघांमध्ये बाचाबाची होउन रागाच्या भरात दुलारने सचिनवर दुंडक्याने प्रहार केला होता. यात तो जागीच मरण पावला होता. मागाहून कोलवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुलार याला ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली होती. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांनी संशयितावर आरोपपत्र दाखल केले होते.

सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या खटल्यात प्रभावी युक्तीवाद करताना संशयितांविरुध्द अनेक परिस्थितीजन्य पुरावे समोर आले असून, मयत सचिन ओरांव याला मारहाण करण्यासाठी वापरलेल्या दंडुक्यावर मानवी रक्ताचे अंश सापडले होते,पेद्रो बारच्या कामगारांना मारहाण करुन सचिन ओरांव व दुलार मुंडा हे पळून गेले होते असे न्यायालयात पुराव्यानिशी सिध्द केले होते.या मारहाणीनंतर दुलार मुंडा याने सचिनला दंडुक्याने मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला होता. खास न्यायदंडाधिकारी सरोजिनी सार्दीन यांनी आरोपीचा जबाब घेतला होता. त्यात त्याने गुन्हयाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सचिन ओरांवने कामगारांना मारहाण केल्याने चिडून आपण त्याला मारहाण केली असता, त्याला मृत्यू आल्याचे सांगून, खूनाच्या गुन्हयाबददल आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठाविण्याची मागणी सरकारी वकील सुभाष देसाई यांनी केली होती.

सरकारपक्षाने दाखल केलेल्या पुराव्यात अनेक त्रुटी असून, आरोपीने सचिन ओरांवचा खून केला याबददल ठोस पुरावे सादर न केल्याने आपल्या अशिलाची सुटका करावी अशी मागणी संशयिताच्या वकिलाने आपल्या युक्तीवादात केली होती.

20 फेब्रुवारी रोजी वाडी - बाणावली येथे एका शेतात मानवी हाडाचा सापळा सापडला होता. डीएनए चाचणीत तो सापळा सचिनचा असल्याचे स्पष्ट झाले होते. कोलवा पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करुन संशयिताला अटक केली होती. या खून खटल्यात एकूण41 मुददेमाल जप्त केले होते. या खटल्यात गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाचे डॉ. सुनील चिंबलकर यांनी आपल्या साक्षीत कोलवा पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार आपण एका पंचवीस ते तीस वर्षीय मृतदेहाची शवचिकित्सा केली होती. मयताच्या डोक्यावर अवजड वस्तुने प्रहार झाल्याने मेंदुची कवटी फुटून त्याचा मृत्यू झाल्याचे आपणाला आढळून आल्याची साक्ष न्यायायलात दिली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय