शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Gangster Raju Theth: १० वर्षांपासून प्लॅनिंग! लॉरेन्स गँगने ‘असा’ रचला राजू थेठच्या हत्येचा कट; लेडी डॉनचाही समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:47 IST

राजू थेठ लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता, असे सांगितले जात आहे.

Gangster Raju Theth:राजस्थानमधील सीकरमध्ये पुन्हा एकदा गँगवॉरची घटना समोर आली. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी घेतलेल्या बिश्नोई गँगनेच राजस्थानी गँगस्टर राजू थेठ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येच्या नंतर दोन तासांतच या घटनेची जबाबदारी घेतली. एका फेसबुक पोस्टमध्ये, बिश्नोई गँगचा रोहित गोदारा याने हत्येची जबाबदारी घेतली. बलवीर आणि आनंदपाल यांच्या हत्येचा हा बदला घेतला गेला, असेही त्याने सांगितले.

गँगस्टर राजू थेठ त्याच्या घरी पीजी हॉस्टेल चालवत असे. या हल्ल्यात राजू थेठसह पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा या गोळीबारात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याच्या वेळी एक व्यक्ती व्हिडिओ बनवत होता. त्याच्या पायालाही गोळी लागली आहे. राजू थेठ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अन्य एकूण तीन जणांना गोळ्या लागल्या होत्या. 

गेल्या १० वर्षांपासून राजू थेठवर होती नजर

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या माहितीनुसार, सुमारे १० वर्षांपासून राजू थेठच्या हत्येची योजना आखली जात होती. या प्लॅनमध्ये लॉरेन्स बिश्नोईसह आनंदपाल टोळी आणि काला जाठेदी टोळीतील शूटर्सचा यामध्ये समावेश होता. यामुळे राजू थेठ हा बऱ्याच दिवसांपासून या टोळीच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बारकाईने स्कॅन केले. त्यात ४ जण दिसत आहेत. यामध्ये एक जण त्याच्याशी बोलताना दिसत आहे. तत्पूर्वी, या हत्येची जबाबदारी रोहित गोदरा या फेसबुक आयडीवरून घेण्यात आली आहे. आनंदपाल आणि बलबीर बानुदा यांच्या हत्येचा बदला घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. रोहित गोदाराने लिहिले आहे की, मी हत्येची जबाबदारी घेतो, बदला पूर्ण झाला आहे.

दरम्यान, आनंदपाल पोलीस चकमकीत मारला गेला. आनंदपालच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड लेडी डॉन अनुराधा हिने लॉरेन्स बिश्नोई आणि कला जठेडी यांच्याशी हातमिळवणी केली. लॉरेन्स आणि काला जठेडी टोळीने मिळून राजू थेठची हत्या केल्याचे सांगितले जाते. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे हल्लेखोर बिनदिक्कत गोळीबार करत असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हिडिओमध्ये चार आरोपी दिसत आहेत. चौघांच्याही हातात शस्त्रे आहेत. आरोपींनी राजू थेठ याच्यावर गोळीबार सुरू करताच तेथे चेंगराचेंगरी झाली. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक धावू लागतात. त्याचवेळी गोळीबार करून आरोपी अगदी आरामात पुढे निघून जातात. यादरम्यान एका आरोपीने हवेत गोळीबार केल्याचेही दिसते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी