शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

घरी कोणीच नाही, तू भेटायला ये; गर्लफ्रेंडच्या 'त्या' मेसेजनं घात केला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 9:03 AM

पोलिसांकडून तिघांना अटक; सर्व आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

गाझियाबाद: कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं आहे. प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी हा खून केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यापासून ते फरार होते. या तिघांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या पंकजचा मृतदेह एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या खड्ड्यात आढळून आला. त्यानंतर परिसरात खळबळ माजली. मृतदेह सापडल्यानंतर पंकजची प्रेयसी अंकिता, तिचे वडील हरिओम आणि आई सुलेखा फरार होते. त्यांना काल सकाळी साहिदाबाद रेल्वे स्थानक पोलिसांनी अटक केली. आपणच पंकजचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. पंकज 9 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. गाझियाबादचे (शहर) पोलीस अधीक्षक मनीष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज चौथ्या वर्षात शिकत होता. अंकिता त्याच्याकडून ट्युशन घ्यायची. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पंकजनं शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. याला अंकितानं होकार दिला. अंकिताच्या आई, वडिलांना या सर्व गोष्टींची कल्पना येताच त्यांनी पंकजला मारण्याची योजना आखली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी यामध्ये अंकितालादेखील सामील करून घेतलं.9 ऑक्टोबरला अंकितानं पंकजला घरी बोलावलं. घरी मी एकटीच आहे. तू मला भेटायला ये, असं अंकितानं पंकजला सांगितलं. यानंतर पंकज गिरीधर एन्क्लेव्ह कॉलनीत असलेल्या अंकिताच्या घरी पोहोचला. अंकिता पंकजला बेसमेंटला घेऊन गेली. तिथे आधीच खड्डा खणून ठेवण्यात आला होता. पंकज अंकितासोबत बेसमेंटमध्ये येताच लपून बसलेले अंकिताचे आई, वडील समोर आले. त्यांनी पंकजचे हात, पाय बांधले आणि गळा दाबून त्याला संपवलं. यानंतर तिघांनी पंकजचा मृतदेह खड्ड्यात ढकलला आणि तो खड्डा बुजवला.