लव्ह जिहादमुळे उचलले टोकाचे पाऊल, मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
By पूनम अपराज | Updated: January 10, 2021 17:51 IST2021-01-10T17:50:52+5:302021-01-10T17:51:43+5:30
Love Jihad : नाव बदलून आदिलने आपल्या मुलीशी मैत्री केली असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला.

लव्ह जिहादमुळे उचलले टोकाचे पाऊल, मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने सुसाइड नोटही लिहिलेली आहे, जी आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये मुलीने आदिल नावाच्या मुलाला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. नाव बदलून आदिलने आपल्या मुलीशी मैत्री केली असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला.
सुसाइड नोट जप्त
ही घटना भोपाळच्या टी टी नगर भागातील आहे. येथे राहणार्या युवतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीची एक सुसाइड नोट सापडली, ज्यामध्ये म्हटले आहे कीत्या सुसाईट नोटमध्ये 'माझे नाव पूजा आहे. मी आत्महत्या करणार आहे. याला आदिल खान जबाबदार आहे. आदिल खान सन ऑफ खालिक खान 'असे लिहिले होते. आदिलचा मोबाइल नंबर आणि त्याच्या घराचा पत्ताही सुसाईड नोटमध्ये लिहिलेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपी युवकास अटक केली.
कुटुंबाचा लव्ह जिहादचा आरोप
दरम्यान, शुक्रवारी मुलीचे कुटुंबीय टी. टी. नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि आरोपी युवकावर लव्ह जिहादचा आरोप केला. आदिल नावाच्या मुलाने आपल्या मुलीला बबलू नावाने मैत्री केली असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी आणि भावाने केला आहे. नंतर जेव्हा तिच्या मुलीला हे समजले की तिच्या मित्राचे नाव बबलू नाही तर आदिल आहे तेव्हा तिने त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की, त्यांची मुलगी आदिलसोबतची मैत्री संपवण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हा आरोपीने तिच्या मुलीवर अत्याचार केला. त्यामुळेच मुलीने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचा आरोप आहे.