शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

कोट्यवधी रुपयांची जमीन हडपली; बहुजन विकास आघाडीच्या दोघा माजी नगरसेवकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 5:39 PM

जमिन व्यवहाराच्या मूळ साठे करारात बदल करत खोट्या सह्या करून फेरफार करून फसवणूक केल्याचं प्रकरण

आशिष राणे,वसई  

लोकमत न्यूज नेटवर्कवसई पूर्व बाफाणे येथील कोट्यावधी रूपयांची जमीन बनावट दस्त खोट्या सह्या करून हडप केल्याप्रकरणी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दोन माजी नगरसेवकांसहित अन्य सहा जणावर मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वसई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अली सिद्धिकी (५७) रा. मुंबई यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मा.न्यायालयाच्या आदेशानुसार सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे सोमवार दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी वसई पोलीस ठाण्यात गु.रजि.क्रं. ३४८/२०२१ अन्वये ८ आरोपींवर भा.दं.सं.कलम  ४२०,४४७,४६५,४६७,४६८,४७१,आणि १२० (ब ) प्रमाणे हा गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुंबई चांदिवली येथे राहणारे फिर्यादी अली सिद्धीकी (५७) यांची वसई तालुक्यातील मौजे बाफाणे येथे सर्व्हे क्रं. ३६ हिस्सा क्रं.१ मधील क्षेत्र १२. ४ मी. मालकीची जमीन २०२० साली कायम खरेदी खताने शशिकांत म्हात्रे रा. वसई आणि राजेश नंदा यांना विक्री केली होतीमात्र धीरज पाटील याने पुर्वीच ही जमीन २०१८ मध्येच विक्री केल्याचे व त्या बदल्यात फिर्यादी सिध्दीकी यांनी २५ लाख रुपये घेतल्याचा रोखीचा एक खोटा करार त्यांच्या बनावट सहीने खोटा साठे करार ही तयार करण्यात आल्याचा बनाव करण्यात आला आहे.

याउलट गंभीर म्हणजे फिर्यादि सिद्दीकी यांच्या मालकीचे सर्व्हे क्रं.३६,३८,३९,४०,४१ मधील ४३८ गुंठे जमीन आरोपी रमेश जयराम घोरकाना, मिलिंद जगन्नाथ घरत ,प्रवीण प्रकाश गावरे,हनिप इब्राहिम शेख सर्व रा. वसई यांना जमीन विकली असल्याचा साठे करार रद्द केला असताना मूळ साठे करारामध्ये २ चेक दिले असे नमूद असताना तसेच मुळ साठे करारावर फोटॊ न लावता सह्या केलेले असताना २ चेक एवजी ३ चेक दिले असे नमूद करून तसेच साठे करारावर फोटॊ लावून मूळ साठे करारात बदल करून खोटा व बनावट साठे करार करून सिध्दीकी यांची फसवणूक केली आहे

दरम्यान सिद्दीकी यांच्या तक्रारीत आपण असा कोणताही करार केला नाही तर आपली फसवणूक झाली म्हणूनच सर्व आठ जणांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यावर अखेर वसई पोलिसांत गुन्हा दाखल केला असल्याचे दाखल गुन्ह्यात म्हंटल आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे वसई पोलिसांनी सांगितले.

ही तर लोकप्रतिनिधीची संघटित गुन्हेगारी ;

या मौजे.बाफाणे जमीन प्रकरणातील दोघे जण हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पक्षाचे तथा वसई विरार शहर महापालिकेतील माजी सभापती रमेश जयराम घोरकानां व माजी नगरसेवक मिलिंद जगन्नाथ घरत म्हणून हे दोघेही दि.२८ जून २०२० पर्यंत कार्यरत राहिलेले लोकप्रतिनिधी असून या आणि अशा संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पक्ष बदनाम झाला आहे.

वसई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींची नावे१) धीरज आत्माराम पाटील रा.कामण ता.वसई२) शहाबुद्दीन अब्दुल हमीद शेख रा.जोगेश्वरी३) सिध्दार्थ रामेश्वर साहू रा.नालासोपारा (प)४) रमेश जयराम घोरकाना रा.वालीव जि. पालघर५) मिलिंद जगन्नाथ घरत रा.गवराईपाडा, वालीव६) प्रवीण प्रकाश गावरे रा.फादरवाडी ,वालीव७) हनिप इब्राहिम शेख रा. एवरशाईन,वसई (पू)८) अब्दुल कादर अगवानी रा.युनिक पार्क ,मालाड 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी