"माझ्या नावावर जमीन करून दिली जात नाही, म्हणून आत्महत्या करतोय"; एका कॉलवरून पोलिसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:02 AM2021-03-30T10:02:15+5:302021-03-30T10:02:32+5:30

दादा पाटील यांचे व त्यांचे पुतणे भाऊसाहेब घोळवे यांच्यांत वडिलोपार्जित २५ गुंठे जमीनीबाबत  वाद होता त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला

"Land is not given in my name, so committing suicide"; From a call, the police in Action ... | "माझ्या नावावर जमीन करून दिली जात नाही, म्हणून आत्महत्या करतोय"; एका कॉलवरून पोलिसांनी...

"माझ्या नावावर जमीन करून दिली जात नाही, म्हणून आत्महत्या करतोय"; एका कॉलवरून पोलिसांनी...

Next

पुणे - वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी एका क्षणात दाखवलेल्या अचूक प्रसंगावधानामुळे एक जणांचा जीव वाचला असुन घरगुती तंटादेखील मिटवण्यात यश आले आहे

निंबोडी ता इंदापुर येथील नारायण अनंत घोळवे उर्फ दादा पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेव्दारे कॉल दिला माझ्या नावावर जमीन करुन दिली जात नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. वरील प्रकारचा कॉल हा गावामध्ये प्रसारीत होत नसल्याने हा कॉल फक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार  यांचे मोबाईलवरती ग्रामसुरक्षा यंत्रनेव्दारे आल्यामुळे त्यांनी तत्काळ सदरची माहिती भवानीनगर दुरक्षेत्राला देत स्वतः तातडीने भेट घेऊन त्यांची अडचण समजावुन घेतली  तसेच त्यांना अशा प्रकारचा आत्मघातकी उपाय करू नये म्हणुन समजूत घातली. दादा पाटील यांचे व त्यांचे पुतणे भाऊसाहेब घोळवे यांच्यांत वडिलोपार्जित २५ गुंठे जमीनीबाबत  वाद होता त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला  कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक  लकडे सहाय्यक फौजदार  बनकर यांनी याकामी कर्त्यव्यतत्परता दाखवीली त्यामुळे आत्महत्या करणा-या व्यक्तीला जीवनदान भेटले आहे

पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही मालमत्ता विषयक गुन्हे घडु नयेत, तसेच नागरिकांना पोलीसांची वेळेवर मदत मिळावी या करीता नागरिकांच्या सहभागातुन गावांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा ही कार्यान्वित केली आहे या यंत्रणेमुळे व  संवेदनशील अधिकारी वर्गामुळे  या ग्रामसुरक्षा यंत्रणेला यश मिळत आहे

 

Web Title: "Land is not given in my name, so committing suicide"; From a call, the police in Action ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस