शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची जमीन हाडपण्याचा प्रयत्न, दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:04 IST

आरोपींविरोधात जमीन व्यवहारासंबंधी विविध पोलीस ठाण्यात फसवणूकीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

ठळक मुद्देगारखेड्यातील  गट नंब४८ मध्ये २० गुंठे जमिनीवर भूखंड माफियांचा डोळा

औरंगाबाद: बनावट कागदपत्राच्या आधारे निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची कोट्यवधी रुपये किमतीची जमीन हाडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भूखंड माफियांना पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपींविरोधात जमीन व्यवहारासंबंधी विविध पोलीस ठाण्यात फसवणूकीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

सफदर अली  मोहम्मद अब्दुला पेशमाम(रा. मोतीवालानगर) आणि मुकुंद गंगाधर कुलकर्णी (रा. गजानन कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, बीड येथील निवृत्त अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी धनराज वैजनाथ निला (रा.विशालनगर) आणि सुभाष ज्ञानोबा मोळवणे (रा. सिडको एन-४), सदाशिव लिंगराज  हरिदास(रा.पानगाव ता. रेणापुर, जि. लातुर)यांनी २००८साली गारखेड्यातील  गट नंब४८ मध्ये २० गुंठे जमीन खरेदी केली होती.  या जमीनीचे सातबारा त्यांच्या नावे असून त्यांच्यात ताब्यात  आहे. असे असताना आरोपींनी तक्रारदार यांच्या नावे बनावट व्यक्ती उभा करून आम मुख्यत्यारनामा(जीपीए )स्वत:च्या नावे तयार करून घेतला.  

या जीपीएच्या आधारे  या जमीनीतील भूखंड विक्रीचा नगरसेवक आत्माराम पवार च्या नातेवाईकांना विक्री केल्याचे दाखविले. एका खरेदीदाराने एक भूखंड खरेदी करण्याचा सौदा केला आणि याबाबत वकिलामार्फत वर्तमानपत्रात जाहिर प्रगटन दिले होते. हे प्रगटन वाचल्यानंतर तक्रारदार हे संंबंधित वकिलांना जावून भेटले तेव्हा फसवणूकीचा भंडाफोड झाला. आरोपींनी कट रचून बनावट कागदपत्राच्या आधारे आपली जमीन हाडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार निला यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. ही तक्रार दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले होते. दरम्यान सहायक आयुक्त रविंद्र साळेखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे,शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे,  राजेश यदमळ, दिपक जाधव आणि विशेष कार्य अधिकारी स्वप्नील विटेकर, शिवाजी बुट्टे यांच्या पथकाने  आज बुधवारी आरोपी सफदर अली आणि मुकुंद कुलकर्णी यांना सेवनहिल परिसरात अटक केली.

नगरसेवक पवार यांचा शोध सुरू याप्रकरणात शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार आरोपी असून पवार सध्या पसार आहे. पवार यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद