शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बंद घर फोडून १८ लाखाचा ऐवज लंपास, तिसऱ्या घटनेमुळे धरणगावात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 01:19 IST

धरणगाव परिसरात चोरीचे सत्र सुरुच

धरणगाव : शहरातील चिंतामणी मोरया परिसरात सोमवारी सकाळी एक बंद घर चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी २८ तोळे सोन्यासह अर्धा किलो चांदीचे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम अशी ऐकून १८ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना २५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. मागील काही दिवसात या परिसरातील ही तिसरी चोरी आहे.

याबाबत दिलीपकुमार छगनलाल संचेती ५८) यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. दिलीपकुमार संचेती हे आपल्या मुलाबाळांसह चिंतामणी मोरया नगरमध्ये भाड्याने राहतात. पाच दिवसापासून ते राजस्थान येथे आपल्या कुलदैवतच्या दर्शनासाठी गेले होते. 

घराला कुलूप बंद करून गेले असता सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शेजारीच राहणारे वडील छगनलाल संचेती हे सकाळी मुलाच्या घराकडे गेले असता त्यांनी घराचा कडी कोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी ही माहिती मोठा मुलगा महेंद्र संचेती यांना सांगितली. तात्काळ यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, पो. कॉ. वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत होते. घरात प्रचंड नासधूस करून कपाटातील लॉकर मधील साहित्य बाहेर फेकलेल्या अवस्थेत होते. सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल चोरून नेले. संचेती हे राजस्थान वरून संध्याकाळी उशिरा आल्यामुळे धरणगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस