लालबाग: मुलीनेच केली आईची हत्या; पोलिसांकडून अटक

By मनीषा म्हात्रे | Updated: March 15, 2023 14:29 IST2023-03-15T14:28:54+5:302023-03-15T14:29:16+5:30

 पोलिसांनी तिचा मृतदेह कपाटात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता.

Lalbagh: Mother killed by daughter; Arrested by the police crime news | लालबाग: मुलीनेच केली आईची हत्या; पोलिसांकडून अटक

लालबाग: मुलीनेच केली आईची हत्या; पोलिसांकडून अटक

मुंबईतील लालबाग पेरू कंपाऊंड परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत ५०ते ५२ वय असलेल्या महिलेचा मृतदेह मिळून सापडला होता. सदर मृतदेह महिला राहत असलेल्या राहत्या घरातील कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला. तिची हत्या तिच्या मुलीनेच केल्याचे समोर आले असून पोलिसांनी मुलीला अटक केली आहे. 

 या घटनेची माहिती माहिती रात्री उशिरा पोलिसांना  मिळाली होती. काळाचौकी पोलीसानी मृत महिलेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. महिलेची मुलगी रिंपल प्रकाश जैन, वय २४ वर्षे हिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह कपाटात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. एवढेच नाही तर महिलेच्या शरीरावर वार करण्यात आल्याचे, तसेच हात पाय असे शरीराचे अनेक भाग कापण्यात आले होते 

बाथरूम मध्ये स्टिलच्या टाकीमध्ये शरीराच्या हाताचे पायाचे व इतर अवयवाचे तुकडे मिळुन आले होते. विणा प्रकाश जैन यांचा मृतदेह सापडला होता. विना जैन आणि तिची मुलगी रिम्पल या दोघीच या घरात  राहत होत्या. विणा यांचा भाऊ गुंडेचा गार्डनमध्ये राहतो. तर रिम्पल ही अविवाहित होती. 
 

Web Title: Lalbagh: Mother killed by daughter; Arrested by the police crime news