शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Lakhimpur Kheri Case : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगाच मुख्य आरोपी, ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:26 IST

Lakhimpur Kheri Case : या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे.

लखनऊ - देशभर खळबळ उडवून देणाऱ्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणी चौकशी करत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज एकूण १४ आरोपींविरुद्ध लखनऊ कोर्टात ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा आशिष घटनास्थळी होता, असे एसआयटीने आरोपपत्रात नमूद केले आहे. 

लोखंडी पेटीत ५ हजार पानांचे आरोपपत्र घेऊन एसआयटीची टीम लखनऊ न्यायालयात पोहोचली. आरोपपत्रात पोलिसांनी आशिष मिश्रा यांच्या आणखी एका नातेवाईकालाही आरोपी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र शुक्ला यांच्यावर पुरावे लपवल्याचा आरोप आहे. आशिष मिश्रा यांच्या जीपच्या मागे धावणाऱ्या दोन वाहनांपैकी एक वीरेंद्रची स्कॉर्पिओ होती. आधी शुक्लाने आपली स्कॉर्पिओ लपवली आणि दुसऱ्याची गाडी दाखवली. आशिष मिश्रा यांच्या शस्त्रांनी गोळीबारएसआयटीने आपल्या तपासात लखीमपूर हिंसाचारात आशिष मिश्रा याने शस्त्रांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. आशिष मिश्रा यांच्या रिव्हॉल्व्हर आणि रायफलमधूनही गोळीबार करण्यात आला. आशिष मिश्रा आणि अंकित दास परवानाधारक शस्त्रांनी गोळीबार करत होते, असे एसआयटीने आरोपपत्रात म्हटले आहे. तर आशिष मिश्रा म्हणाले होते की, 1 वर्षापासून त्यांच्या शस्त्रांमधून गोळीबार झाला नाही. बॅलेस्टिक अहवालाच्या आधारे पोलिसांनी गोळीबाराला दुजोरा दिला आहे.या प्रकरणातील १३ आरोपी तुरुंगात आहेतया प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे. वीरेंद्रवर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. वीरेंद्र हे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मेहुणा आहे आणि पालिया ब्लॉकचे सध्याचे ब्लॉक प्रमुख आहेत.3 ऑक्टोबर रोजी हिंसाचार झाला होता३ ऑक्टोबर रोजी लखीमपूरमधील तिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली.याप्रकरणी एसआयटीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये लखीमपूरच्या तिकुनिया येथील हिंसाचार हा अपघात किंवा निर्घृण हत्या नसून हत्यार घेऊन गंभीर कट रचून खुनाच्या प्रयत्नाची घटना असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीवरून कोर्टाने आशिष मिश्रा यांच्याविरोधात आणखी कडक कलमे लावली आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPoliceपोलिसCourtन्यायालयHome Ministryगृह मंत्रालयFiringगोळीबार