एकतर्फी प्रेम किंवा विवाहबाह्य संबंध अशा गोष्टी हल्ली सर्रास ऐकायला मिळतात. विवाहबाह्य संबंधांना भारतीय संस्कृतीत मान्यता नाहीच. पण एकतर्फी प्रेमाबाबत विविध पैलू ऐकायला मिळतात. सध्या असेच प्रकरण समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण दोन मुलींच्या प्रेमाचे आहे आणि यात चक्क AI टूल्सची मदत घेण्यात आली आहे.उत्तर प्रदेशातील एका २२ वर्षांच्या मुलीला एका शाळेत कंत्राटी शिक्षिका म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ती पूर्वी त्याच शाळेत शिकत होती. त्या शाळेत अनुभवी महिला शिक्षिका होती, जी नंतर मुख्याध्यापिका बनली. कंत्राटी शिक्षिकेला ती आधीपासूनच आवडायची. जेव्हा ती मुख्याध्यापिका झाली तेव्हा कंत्राटी शिक्षिकेचे तिच्याबद्दलचा प्रेम आणि ओढ अधिकच वाढली. ती सतत मुख्याध्यापक महिलेला फोन आणि मेसेज करत असे. त्यातूनच पुढे विचित्र घटना घडली.
सुरूवातीला काय घडलं?
मुख्याध्यापकांच्या पतीने यावर आक्षेप घेतला. त्याने मुख्याध्यापकांना त्या महिला शिक्षिकेपासून दूर राहण्यास सांगितले. मुख्याध्यापकांनीही तिच्या पतीशी सहमती दर्शवली. पण त्या महिला शिक्षिकेला हे सर्व आवडले नाही. त्यानंतर तिने विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली जेणेकरून मुख्याध्यापकांनी तिच्याशी बोलावे. प्रथम त्या महिलेने भावनिक खेळ खेळला. तिने संपूर्ण शाळेत अफवा पसरवली की तिला कर्करोग आहे. तिने याचा व्हिडिओ बनवला आणि तो शाळेतील कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना पाठवला. पण मुख्याध्यापकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने पुढचे पाऊल उचलले. त्यानंतर त्या महिला शिक्षिकेने तिच्या मृत्यूची अफवा पसरवली. तिने तिच्या फोटोवर हार घालून एक पोस्ट व्हायरल केली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संदेश मिळाला. असे असूनही, जेव्हा मुख्याध्यापकांनी लक्ष दिले नाही, तेव्हा तिने आणखी धोकादायक पाऊल उचलले.
एआय टूल्स वापर
कर्करोगाचे नाटक आणि मृत्यूची अफवा अयशस्वी झाल्यानंतर, मुलीने मुख्याध्यापकांच्या जवळच्या दुसऱ्या शिक्षिकेला लक्ष्य केले. तिने एआय टूल्सच्या मदतीने तिचे आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. जेव्हा मुख्याध्यापकांना कळले की कोणीतरी तिचा बनावट आयडी तयार केला आहे, तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार केली. मुख्याध्यापकांनी सांगितले की कोणीतरी तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आणि त्यावर तिचे एआय-जनरेटेड फोटोशॉप केलेले फोटो अपलोड केले. इतकेच नाही तर तिची प्रतिमा खराब करण्यासाठी हे फोटो शाळेतील कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. तक्रार मिळाल्यानंतर डीसीपी (उत्तर) राजा बांठिया यांच्या देखरेखीखाली तपास सुरू करण्यात आला.
अशी झाली अटक
पोलिसांनी आयपी लॉग, नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. काही तासांतच पोलिस आरोपी शिक्षकापर्यंत पोहोचले. सुरुवातीला त्या कंत्राटी महिलेने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु डिजिटल पुराव्यांमुळे त्याचा संपूर्ण कट उघड झाला. त्यानंतर बुधवारी तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३१९ (फसवणूक), ३३६ (२) (बनावट प्रकरणे) आणि ३५६ (२) (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.