मध्यरात्री महिला शिपायाला भेटायला घरी गेला इन्स्पेक्टर; नातेवाईकांनी धू धू धुतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 14:41 IST2021-10-25T14:39:50+5:302021-10-25T14:41:39+5:30

महिला शिपायाला भेटायला गेलेल्या पोलीस निरीक्षकाला मारहाण; प्रकरण पोहोचले पोलीस ठाण्यात

lady constable family beat the police inspector in agra | मध्यरात्री महिला शिपायाला भेटायला घरी गेला इन्स्पेक्टर; नातेवाईकांनी धू धू धुतलं

मध्यरात्री महिला शिपायाला भेटायला घरी गेला इन्स्पेक्टर; नातेवाईकांनी धू धू धुतलं

आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्र्यात एका पोलीस निरीक्षकाला मारहाण झाली आहे. एका महिला पोलीस शिपायाच्या कुटुंबानं पोलीस निरीक्षकाला मारहाण केली. पोलीस निरीक्षक महिला शिपायाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्यावेळी शिपायाच्या कुटुंबीयांनी त्यांना पकडलं आणि मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस ठाण्यात हा वाद मिटला.

आग्र्यात तैनात असलेल्या एका पोलीस निरीक्षकाची एका महिला पोलीस शिपायासोबत मैत्री होती. त्या शिपायाला भेटण्यासाठी निरीक्षक रविवारी रात्री एत्मादपूरला पोहोचला होता. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडलं. नातेवाईकांनी त्याला घरातून रस्त्यावर आणलं. महिला शिपायाची बहिण, भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी निरीक्षकाला मारहाण केली. यानंतर नातेवाईक त्याला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी निरीक्षकाची कॉलर धरून त्याला रस्त्यावर नेताना दिसत आहे. रस्त्यावर चालत असताना तरुणी निरीक्षकाच्या कानशिलात लगावत आहे. दोघांमध्ये काहीतरी वाद होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. काहीतरी गैरसमज झाल्यानं मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार बालियान यांनी दिली. दोन्ही पक्षांनी हे प्रकरण मिटवलं. पण महिला शिपाईनं यावर अद्याप तरी कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

Web Title: lady constable family beat the police inspector in agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.