शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरातील कृष्णा जाधव खून प्रकरणातील फरारी आरोपीला दोन वर्षानंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 14:19 IST

३० लाख रुपये खंडणीची खंडणी दिली नाही म्हणुन आरोपींनी खून केला...

बारामती: बारामती शहरातील कृष्णा जाधव या गाजलेल्या खुन खटला प्रकरणी फरारी आरोपीला दोन वर्षांनी अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मोठा बिट्या उर्फ सचिन रमेश जाधव (वय २७,रा  कॉलनी,तांदुळवाडी,बारामती)असे फरारी आरोपीचे नाव आहे.पोलीस निरीक्षक औदुुंबर पाटील यांनी याबाबत माहिती दिली.याबाबत माहिती अशी, गुन्ह्यातील एकुण २१ आरोपींनी कृष्णा जाधव यास वेळोवेळी ३० लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.खंडणी दिली नाही म्हणुन वरील आरोपींनी संगनमत करून कट रचला. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी कृष्णा उर्फ नाना महादेव जाधव( वय ५५ वर्षे रा.कैकाडगल्ली ,नेवसेरोड ,बारामती) हे त्यांचे चालक प्रभाकर पवार याला बारामती हॉस्पीटल प्रा.लि.बारामती येथे पाहण्यासाठी जात होते.यावेळी  ते एकटे आहेत हे पाहुन व पाळत ठेवुन रस्त्यामध्येच त्यांच्यावर धारदार हत्याराने शरीरावर वार करून खून करण्यात आला.

त्यांच्या खुनाबाबत त्यांची पत्नी सपना कृष्णा जाधव यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात एकुण २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये एकुण ४ विधीसंघर्षीत बालक होते. त्यानंतर तर सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे वाढीव कलम लावुन गुन्हयास मोक्का लावण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुर्वीपासुन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी तपास केला आहे. यामध्ये शिरगांवकर यांनी आजपर्यंत गुन्हयातील १७ आरोपीस अटक करून मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.गुन्हयातील हवा असलेला आरोपी क्रमांक ११) मोठा बिटया उर्फ सचिन रमेश जाधव हा खून झाल्याच्या दिवशीपासुनच फरार झालेला होता. तसेच त्याने स्वता:कडील मोबाईल क्रमांक बंद करून इतर नातेवाईक, मित्रांशी संपर्क करण्याचे बंद केलेले होते. मात्र, तो सोलापुर शहरात सलगरवस्ती परिसरात राहत असल्याची माहिती सोलापुर शहर पोलिसांनी कळविले होते. त्यानंतर शहर पोलिसांनी सलगरवस्ती पोलीस ठाणे यांचे मदतीने फरार आरोपीस ताब्यात घेतले. त्याला ३  सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान अटक करण्यात आली आहे. आरोपीस मोक्का न्यायालयाने  ६ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. अटक आरोपी जाधव याचेवर शहर पोलीस ठाण्यात एकुण ८ गुन्हे दाखल आहेत.न्यायालयाने  त्याची दखल घेतलेली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगांवकर  करीत आहेत.———————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी