शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

Sanjay Roy : "मी त्याला भेटले तर विचारेन..."; कोलकाता प्रकरणातील आरोपी संजयच्या आईचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 10:50 IST

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : कोलकाता प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयच्या आईने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयच्या आईने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याची आई म्हणाली की, "मी त्याच्याशी अधिक कठोर वागले असते तर ही घटना टाळता आली असती. जर मी जास्त कडक झाले असते तर हे घडलं नसतं."

ती पुढे म्हणाली की, "त्याचे वडील खूप कडक होते, माझ्या पतीच्या मृत्यूनंतर सर्व काही बिघडत गेलं आहे. माझं सुंदर कुटुंब आता फक्त एक आठवण म्हणून राहिलं आहे. मला माहीत नाही की त्याला हे करण्यासाठी कोणी प्रभावित केलं. जर कोणी त्याला यामध्ये अडकवलं असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा होईल."

संजय रॉयच्या आईने सांगितलं की "आपला मुलगा शाळेत टॉपर होता आणि नॅशनल कॅडेट कोरचा भाग होता. तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यासाठी जेवणही बनवायचा. तुम्ही शेजाऱ्यांनाही विचारू शकता, त्याने कधीही कोणाशीही गैरवर्तन केलं नाही. जर मी त्याला भेटले तर विचारेन, 'बाबू, तू असं का केलंस?' माझा मुलगा असा कधीच नव्हता."

"संजयची बायको खूप चांगली होती"

पहिल्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलाला दारूचं व्यसन लागलं. संजयची पहिली बायको खूप चांगली मुलगी होती. ते दोघे आनंदी होते. अचानक तिला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पत्नीच्या मृत्यूनंतर तो नैराश्यात गेला आणि दारू प्यायला लागला असण्याची शक्यता आहे असंही आईने सांगितलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या एका दिवसानंतर संजय रॉयला अटक करण्यात आली. गुन्हा झाला त्या दिवशी तो इमारतीत शिरताना दिसला आणि त्याचे ब्लूटूथ हेडफोन सापडले. संजय रॉयच्या मोबाईलमध्ये अनेक हिंसक अश्लील व्हिडिओही आढळून आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर