शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:13 IST

Kolkata Case : पीडितेच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं आहे की, आरोपीने विद्यार्थिनीला श्वास घेण्यास त्रास होत असताना इनहेलर दिला.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. २४ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणाबाबत आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. एका रिपोर्टनुसार, पीडितेच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं आहे की, आरोपीने विद्यार्थिनीला श्वास घेण्यास त्रास होत असताना इनहेलर दिला.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारादरम्यान तिला पॅनिक अटॅक आला होता. त्यामुळे तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मुख्य आरोपी मनोजीतने त्याचा साथीदार जैब अहमदला इनहेलर आणण्यास सांगितलं आणि त्याने पीडितेला इनहेलर दिला. पीडितेच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने न्यायालयात खुलासा केला की, आरोपीने पीडितेची प्रकृती सुधारल्यावर तिच्यावर आणखी अत्याचार करण्याचा प्लॅन केला होता.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आरोपी

रिपोर्टनुसार, कोलकाता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज सापडलं आहे ज्यामध्ये आरोपी जैब मेडिकल स्टोअरमधून इनहेलर खरेदी करताना दिसत आहे. मेडिकल स्टोअरच्या मालकाने देखील पुष्टी केली आहे की, आरोपीने ३५० रुपये देखील दिले होते.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

कोलकाता लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात अटक केलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीत ८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. या तिघांमध्ये मुख्य संशयित मनोजीत मिश्रा आणि इतर दोन विद्यार्थी - जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी यांचा समावेश आहे. मिश्रा हा लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि कर्मचारी होता. ही घटना २५ जून रोजी संध्याकाळी कॉलेजमध्ये घडली. या तिघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीPoliceपोलिसCourtन्यायालय