शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

व्यसनमुक्तीच्या उपचारास घेऊन जात असल्याच्या रागातून चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 6:28 PM

आरोपीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी घेऊन जात होते...

पिंपरी : भाच्याला व्यसनमुक्त करण्यासाठी त्याच्यावर उपचार करण्याचे ठरले. मात्र उपचारासाठी तो तयार झाला नाही. तरीही त्याला रुग्णालयात घेऊन जात असल्याने राग आल्याने त्याने चाकूने हल्ला करून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कासारवाडी येथे रविवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा परम विश्वकर्मा (वय ३०, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. परम भोटे विश्वकर्मा (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तर लालबहादूर भोंटे असे आरोपीचे नाव आहे. फियार्दी दीपा व जखमी परम पतीपत्नी आहेत. तर आरोपी लालबहादूर हा फिर्यादी  दीपा यांचा भाचा आहे. फिर्यादी दीपा व त्यांचे पती परम हे दोघे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी लालबहादूर याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी घेऊन जात होते. त्यासाठी लालबहादूर तयार नव्हता. त्यामुळे त्याचा त्याला राग आला. त्यातून त्याने कासारवाडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर परम विश्वकर्मा यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत..

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस