शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वादातून शस्त्राने वार करत तरूणाची हत्या; भंडारा शहरातील घटना

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: March 12, 2024 20:37 IST

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

भंडारा : वादातून दोघांनी एका तरुणावर चाकुने सपासप वार केले. यात तरूण जागीच गतप्राण झाला. कपील अशोक उजवणे (३१, भगतसिंग वॉर्ड टाकळी) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवार मध्यरात्रीच्या सुमारास शहराला लागून असलेल्या टाकळी येथे घडली असली, तरी मंगळवारला सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हत्येनंतर कपीलचा मृतदेह लपविण्यासाठी नालीत फेकून त्यावर दुचाकी ठेवण्यात आली. ऋषभ संजय दोनोडे (२०) आणि करण दिलीप भेदे (२०) दोन्ही रा. भगतसिंग वॉर्ड टाकळी अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. मंगळवार सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच ताफा घटनास्थळी दाखल झाला. 

पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी ऋषभ दोनोडे आणि करण दिलीप भेदे यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी करीत आहेत.

अशी केली हत्यामाहितीनुसार, कपील व ऋषभ आणि करण यांच्यात सोमवारच्या रात्री टाकळी येथे वाद झाला. भांडण विकोपाला गेले. यातूनच ऋषभ आणि करण यांनी कपीलला टाकळी येथील निर्वाण मेटल कंपनीच्या मागील बाजुच्या मैदानात नेले. तिथे चाकूने कपीलच्या छातीवर, चेहऱ्यावर अनेक वार करुन जिवानीशी ठार मारले. या दोघा मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कपीलचा मृतदेह उचलून मेटल कंपनीच्या मागे असलेल्या सिमेंटच्या नालीत नेऊन फेकला. त्यानंतर मृतदेहावर दुचाकी ठेवून ते पसार झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी