कॉलगर्लची हत्या करणाऱ्याला गोरेगावातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 05:24 IST2018-10-16T05:24:12+5:302018-10-16T05:24:25+5:30
मुंबई : शरीरविक्रय करणाऱया तरुणीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून ती रस्त्यावर सोडून पलायन करणाऱया मौमील हसनला बांगूरनगर पोलिसांनी ...

कॉलगर्लची हत्या करणाऱ्याला गोरेगावातून अटक
मुंबई : शरीरविक्रय करणाऱया तरुणीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून ती रस्त्यावर सोडून पलायन करणाऱया मौमील हसनला बांगूरनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याने गोरेगावच्या इन्फिनिटी मॉलजवळ मृतदेह असलेली बॅग सोडून दिली होती. पैैशांच्या वादावरून त्याने गळा आवळून तिचा खून केला.
हसनने सोमवारी दुपारी अंधेरीतून विमानतळावर जाण्यासाठी कार बुक करून आॅनलाइन पैसे भरले. मोठी सुटकेस घेऊन विमानतळाकडे न जाता चालकाला घेऊन गोरेगावच्या दिशेने गेला. इन्फिनिटी मॉलजवळ गाडीतून उतरून चालकाला जाण्यास सांगितले. त्यानंतर सुटकेस रस्त्यावरच सोडून देत एका रिक्षामध्ये बसून जात असल्याचे चालकाने पाहिले. त्याला संशय आल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून हे कळविले. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.