फोटो काढण्यासाठी घोडा दिला नाही म्हणून खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 03:10 IST2020-08-25T03:10:36+5:302020-08-25T03:10:50+5:30

यातील तीन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने तिघांना २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Killer attack as the horse was not given to take photos | फोटो काढण्यासाठी घोडा दिला नाही म्हणून खुनी हल्ला

फोटो काढण्यासाठी घोडा दिला नाही म्हणून खुनी हल्ला

इस्लामपूर : फोटो काढण्यासाठी घोडा दिला नाही म्हणून सराईत गुंडांच्या पाचजणांच्या टोळीने घोड्यांच्या मालकावर कोयता, गज आणि सत्तूर अशा हत्यारांनी हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दगडी बंगल्याच्या पाठीमागे घडली. यातील तीन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने तिघांना २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जयवंत प्रकाश पाटील (वय २०, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) या घोडे मालकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील मुख्य संशयित गजराज पाटील, सूरज बाबर आणि विक्रांत क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर पंकज मुळीक आणि ज्ञानेश पवार हे दोघे फरार झाले आहेत.

Web Title: Killer attack as the horse was not given to take photos

टॅग्स :Policeपोलिस