शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परळीत मुंडेनामक व्यक्तीचा खून; तहसिल कार्यालयाजवळ मृतदेह फेकला, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 11:45 IST

महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून परळीच्या आंबेजोगाई रोडवरील एका नगरमध्ये रहावयास होते.

संजय खाकरे

परळी (बीड) - गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. खून झालेल्या व्यक्तीचा  मृतदेह परळी तहसील कार्याल्यासमोरील मैदानात रविवार दिनांक 22 रोजी सकाळी आढळून आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली आहे. महादेव मुंडे (रा. भोपळा, तालुका परळी वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खुनाच्या या घटनेने शहर हादरले.

महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून परळीच्या आंबेजोगाई रोडवरील एका नगरमध्ये रहावयास होते. रविवारी सकाळी महादेव मुंडे यांचा मृतदेह येथील तहसिल कार्यालयसमोरील जागेत आढलून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. परळी शहर पोलिसांना ही घटना समजताच तातडीने  शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप, पोलीस जमादार भास्कर केंद्रे, गोविंद भताने, राम रेडेवार, दत्ता गित्ते ,विष्णू फड, किशोर घटमल, व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळविली. लागलीच अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांनी परळीत येऊन घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

हा खुनाचा प्रकार आहे. गळ्यावर व गालावर शस्त्राने वार केल्याने जखमचे व्रण होते. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस तपासात कारण पुढे येईल - रवी सानप .पोलीस निरीक्षक परळी शहर पोलिस ठाणे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparli-acपरळीPoliceपोलिसBeedबीड