तरुणाची हत्या करत मृतदेह टाकला विहिरीत
By मनीषा म्हात्रे | Updated: October 16, 2023 19:12 IST2023-10-16T19:11:44+5:302023-10-16T19:12:32+5:30
मानखुर्दच्या भुतबावडी परिसरात काही मुले पोहचण्यासाठी गेली असताना त्यांचा पायाला मृतदेह तरंगताना दिसून आल्याने खळबळ उडाली.

तरुणाची हत्या करत मृतदेह टाकला विहिरीत
मुंबई : तरुणाची हत्या करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना मानखुर्दमध्ये समोर आली. पोहचण्यासाठी गेलेल्या मुलांना मृतदेह दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी रविवारी रात्री उशिराने हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. करण चौरसिया (२२) असे मृत तरुणाचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहे.
मानखुर्दच्या भुतबावडी परिसरात काही मुले पोहचण्यासाठी गेली असताना त्यांचा पायाला मृतदेह तरंगताना दिसून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळ्यावर वार करत तरुणाची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.
मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तसेच त्याच्या मित्र मैत्रीण तसेच नातेवाईकांकडे पोलीस अधिक चौकशी करत आहे. तरुणाच्या हत्येमागेच गूढ कायम असून पोलीस अधिक तपास करत आहे.