Killed naxal carried 1 lakhs rewards in skirmish | १ लाखांचे इनाम असलेल्या नक्षलवाद्याला घातले कंठस्थान

१ लाखांचे इनाम असलेल्या नक्षलवाद्याला घातले कंठस्थान

ठळक मुद्देचकमक झालेल्या घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.कडती मुत्ता असं या कंठस्नान घातलेल्या नक्षलवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे.

सुकमा - छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात  गचनपल्ली गावात सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांसोबत केलेल्या चकमकीत एक लाखांचे इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा झाला आहे. कडती मुत्ता असं या कंठस्नान घातलेल्या नक्षलवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झालेल्या घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी ही माहिती दिली आहे.

ही चकमक आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास गचनपल्ली गावात झाली. भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नक्षलवाद्यांसोबत ही चमकम झाली. सुरक्षा दलाने यांनी एकत्रित हे ऑपरेशन केले असल्याची माहिती आयजी पी. सुंदरराज यांनी दिली. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूशन अ‍ॅक्शन) ची स्वतंत्र पथके या चकमकीत सहभागी झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Web Title: Killed naxal carried 1 lakhs rewards in skirmish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.