शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; मुलीच्या शोधासाठी पोलिसांचा हैदराबादमार्गे सोलापूरपर्यंत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 13:25 IST

मुंबई : मुंबईतून विक्रीसाठी अपहरण केलेल्या दोन बाळांच्या सुटकेपाठोपाठ सांताक्रूझमधून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका करण्यास गुन्हे ...

मुंबई : मुंबईतून विक्रीसाठी अपहरण केलेल्या दोन बाळांच्या सुटकेपाठोपाठ सांताक्रूझमधून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. भीक मागण्यासाठी तिचे अपहरण केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मुलीच्या शोधासाठी मुंबई ते हैदराबाद तेथून सोलापूर प्रवास करत आरोपीना जेरबंद केले आहे. 

सांताक्रूझ येथील एसएनडीटी कॉलेजसमोरील बसस्टॉप समोरील फुटपाथवरून ३० ऑक्टोबरला रात्री मुस्कान शेख यांची १ वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ आली. सांताक्रूझ पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने याचा समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये आरोपीने सांताक्रूझवरून नालासोपारा ट्रेन पकडलेली दिसून आले. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला.  

पोलिसांचे दुसरे पथक नालासोपाराला गेले. मात्र, तेथेही कोणी हाती लागले नाही. पुढे, दादरवरून हैद्राबादला निघून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी स्थानिक आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक हैद्राबादला पोहोचेपर्यंत आरोपी सोलापूरला निघाल्याचे समोर आले. त्यानुसार, रेल्वे पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. 

दीड महिन्यात ४८७ मुलांची सुटका-

मुंबई पोलिसांनी १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान राबविलेल्या ऑपरेशन रि युनाईट अंतर्गत २५७ मुलींसह एकूण ४८७ अल्पवयीन मुलांचा शोध घेतला आहे. त्यामध्ये यामध्ये रेकॉर्डवरील मिळून आलेली २०३ तर, रेकॉर्डवर नसलेल्या २७६ जणांचा समावेश आहे. या ऑपरेशन दरम्यान ८ बालकामगार मिळून आले आहे.

याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आले असून दोघेही नेहरूनगर येथील रहिवासी आहे. शरिफा शेख आणि सुजाता पासवान अशी या दोघींची नावे आहेत. भीक मागण्यासाठी मुलीचे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे. 

गुरुवारी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते मुलीला सुखरूप आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे,  स्नेहल पाटील पोलीस अंमलदार संजय भोसले,  साधना सावंत,  प्रशांत भूमकर, शार्दुल बनसोडे यांनी ही कारवाई केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई