शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

भागीदारीतील वादातून क्लास चालकाचे अपहरण करुन मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:43 IST

हडपसर परिसरातून पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत येथे नेण्यात आले.यवत परिसरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले.

ठळक मुद्देक्लास चालक महिलेच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : भागीदारीत सुरु केलेल्या शिकवणी व्यवसायात झालेल्या आर्थिक वादातून क्लास चालकाचे अपहरण करुन पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहावर नेऊन त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी भागीदार असलेल्या क्लास चालक महिलेच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकेश कुमार (वय २९, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली होती़. पोलिसांनी नवनाथ शेळके, शिवराज शेळके आणि त्यांच्या बरोबर असलेल्या तीन साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके यांची पत्नी आणि मुकेश कुमार यांनी भागीदारीत हडपसर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत क्लास सुरु केला होता़. त्यात शेळके यांच्यासह अनेकांनी पैसे गुंतविले होते़. काही कारणाने हा क्लास बंद पडला़. या व्यवहारातील ३ लाख रुपये कुमार यांच्याकडे होते. ते पैसे कुमार देत नसल्याने शेळके आणि कुमार यांच्यात वाद सुरु होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कुमार यांना त्यांच्या घराजवळ शेळके आणि साथीदारांनी अडवले. त्यांना धमकावून मोटारीत बसवले. हडपसर परिसरातून पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत येथे नेण्यात आले. यवत परिसरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले. तेथे डांबून ठेवून पट्टयाने मारहाण केली, असा आरोप कुमार यांनी फिर्यादीत केला आहे. शेळके पाटबंधारे विभागात अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण