शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याचे सांगून ठेकेदाराने अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 22:34 IST

एका शासकीय ठेकेदारास दोघा संशयित गुन्हेगारांनी स्वतःला 'क्राईम ब्रँच पोलीस' असल्याचे भासवून गावठी पिस्तुलचा धाक दाखवत मोटारीत बळजबरीने बसवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिकरोड - जयभवानी रोडवरील वास्तुपार्क येथे राहणाऱ्या एका शासकीय ठेकेदारास दोघा संशयित गुन्हेगारांनी स्वतःला 'क्राईम ब्रँच पोलीस' असल्याचे भासवून गावठी पिस्तुलचा धाक दाखवत मोटारीत बळजबरीने बसवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान येथील एका लोकप्रतिनिधीच्या कार्यालयासमोर ठेकेदार शिलसिंह ओमप्रकाश नेहरा यांनी मोटार थांबविण्यास सांगितले असता, त्या अपहरणकर्ता तोतया पोलिसांनी वाहनातून उतरत पळ काढला यावेळी त्यांच्या कमरेला असलेले पिस्तुल रस्त्यावर पोलिसांना आढळून आले; मात्र अपहरणकर्ते फरार होण्यास यशस्वी ठरले.जाचक मळा वास्तु पार्क येथे राहणारे व शासकीय ठेकेदारीचे काम करणारे शिलसिंह ओमप्रकाश नेहरा हे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आपल्या घरून बिटको चौकातील ऑफिसमध्ये जाण्यासाठी चार चाकी गाडीमध्ये (एम एच 15 एफ एस 65 90) बसून जात असतानायावेळी त्यांच्या घराच्या समोरील बाजूस दोघे संशयित अपहरणकर्ते संशयास्पदरीत्या टेहळणी करत असल्याचे लक्षात आले. नेहरा यांच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर दोघानी त्यांची गाडी थांबवून 'आम्ही क्राईम ब्रँच पोलीस कॉन्स्टेबल पाटील आहे. तुमचे नाव नेहरा आहे ना, तुमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे. तुम्हाला जोशी साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलवले आहे' असे सांगून ते दोघे नेहरा यांच्या गाडीत पाठीमागे बसले. नेहरा वास्तु पार्क मधून त्या दोघांना गाडी घेऊन जयभवानी ्रोड येथून जात असताना नगरसेवक कार्यालयाजवळ गाडी हळु करत 'कोणाला तरी सोबत घेतो असे सांगत गाडी थांबविली. नेहरा कार्यालयाबाहेर उभे असलेले संतोष बडदे व श्रीकृष्ण लोहकरे यांच्याकडे गेले असता गाडीत बसलेले ते दोघे भामटे गाडीतून उतरून पळून जाऊ लागले. नेहरा यांना 'तुला व तुझ्या परिवाराला सोडणार नाही,# असे म्हणत त्या दोघांनी जीवन छाया कॉलनीमधून धूम ठोकली.यावेळी तेथे उपस्थित असलेले )कार्यकर्ते हे आजूबाजूचे दुकानदार यांनी त्या दोघा तोतया पोलिसांचा दोन्ही बाजूने पाठलाग सुरू केला. पाठलाग करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्याजवळ गावठी कट्टा असल्याचे लक्षात आल्याने सर्वजण थोडे हळू झाले. पळून जाणाऱ्या त्या दोघा जवळ असलेला गावठी कट्टा खाली पडला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेची माहिती उपनगर पोलीस यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तो गावठी कट्टा जप्त केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक