शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘गुडबाय लाईफ’ असे स्टेटस टाकून खोतवाडीतील तरूणीचा खून, तरुणानेही विष प्यायले

By राजकुमार जोंधळे | Updated: September 21, 2022 05:25 IST

लिंगनूरमधील संशयित तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न : लग्न करण्यास झालेल्या विरोधाचे कारण

कोल्हापूर :‘गुडबाय’ असा नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकून लिंगनूर (ता. कागल) मधील तरूणाने त्याच्या नात्यातील खोतवाडी (इचलकरंजी) मधील तरूणीचा पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात खून करून स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१) असे मृत तरूणीचे नाव आहे. संशयित तरूण कैलास आनंदा पाटील (वय २८) याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू होते.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. आता लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध, नकार होता. त्यावर कैलास याने ऋतुजा हिला मंगळवारी भेटण्यास बोलविले. तिला चारचाकीतून घेवून तो गिरोली घाटात गेला. त्याठिकाणी त्याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो मेसेज वाचून तरूणीच्या नातेवाईकांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिस मोबाईलचे लोकेशन तपासून गिरोली घाटाकडे रवाना झाले. पेठवडगाव आणि कोडोली पोलीसांकडून घटनास्थळी तपास सुरू होता. कैलास याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कैलास याच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. तो फरशी बसविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पुरवण्याचे काम करतो. ऋतुजा ही बी. एस्सी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती.

मी आज जीवन संपवणार आहे...

कैलास याने मंगळवारी सकाळी कोल्हापूरला येताना त्याच्या मित्रांना मी आज जीवन संपवणार आहे. माझा गावात मोठा फोटो लावा असे सांगितले होते. मोबाईलवर त्याने ‘मला माफ करा. मी जात आहे. गुडबाय लाईफ’ स्टेटसही ठेवला होता, अशी माहिती पोलीसांकडून मिळाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट