शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांच्या मदतीला धावली खाकी वर्दी! पोलीस अधिक्षकांकडून दखल; कर्मचाऱ्याचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 13:20 IST

Police News : गणेश विसर्जनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर आणि विशेषत: नदीकाठावर मोठी गर्दी असते. अशावेळी वाहतूक नियोजनासह गर्दी होणार नाही यासाठी यंदा सर्वच ‘स्पॉट’वर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाहतूक शाखेचे कर्मचारीही त्याठिकाणी कार्यरत असतात. गुरूवारी विसर्जनाच्या सातव्या दिवशी सरकारी घाट परिसरात वाहतूक पोलीस निखील जाधव कर्तव्यावर होते. 

सांगली : कोरोनाचे वातावरण नियंत्रणात येत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात उत्साह कायम आहे. याच कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासह नागरिकांच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस कार्यरत आहेत. विसर्जनावेळी अशाच कार्यरत कर्मचाऱ्याने खाकीचा रूबाब बाजूला सारत सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. आणि कर्मचाऱ्याचे काम पाहून अधीक्षक दिक्षित गेडाम यांनीही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गणेश विसर्जनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर आणि विशेषत: नदीकाठावर मोठी गर्दी असते. अशावेळी वाहतूक नियोजनासह गर्दी होणार नाही यासाठी यंदा सर्वच ‘स्पॉट’वर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

 

वाहतूक शाखेचे कर्मचारीही त्याठिकाणी कार्यरत असतात. गुरूवारी विसर्जनाच्या सातव्या दिवशी सरकारी घाट परिसरात वाहतूक पोलीस निखील जाधव कर्तव्यावर होते. नेमके याचवेळी एक कुटूंब दुचाकीवरून गणेशमुर्ती घेऊन विसर्जनासाठी आले. दुचाकीवर महिलेच्या हातात मुर्ती तर पुढे लहान बाळ...त्यामुळे त्या कुटूंबाची अडचण झाली. दुचाकीवरून उतरायचे तर मुर्ती सावरायला कोणीतरी हवे. आणि एकूणच गर्दीमुळे त्यांच्याकडे कोणाचे लक्षही जात नव्हते. मुर्ती हातातच असल्याने ती खाली ठेवून उतरणे धोक्याचे होते. नेमकी हीच अडचण ओळखून जाधव यांनी त्या कुटूंबाजवळ जात ती मुर्ती घेत त्यांना वाहन बाजूला लावण्यात मदत केली शिवाय त्या कुटूंबाला सहकार्यही केले. वाहतूक पोलिसाच्या या मदतीमुळे भारावलेल्या कुटूंबाने त्यांचे विशेष आभार मानले. नियमीत वाहतूक नियोजनाच्या कामाव्यतिरिक्त जाधव यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची अधीक्षक गेडाम यांनीही दखल घेत निखील जाधव यांचा पुष्पगुच्छ देत गौरव केला व खाकीच्या पलिकडे जावून केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख उपस्थित होत्या.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगलीtraffic policeवाहतूक पोलीस