शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

धक्कादायक! मुलीने आईची केली हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन् पोहोचली पोलीस ठाण्यात; सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 12:28 IST

ही घटना बेंगळुरु येथील आहे.

आपल्या स्वत:च्या आईची हत्या करुन मृतदेह सुटकेसमधून पोलीस ठाण्यात आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेंगळुरु येथील आहे. या प्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

अंडरवर्ल्ड डॉनच्या छोट्या भावाचा मृत्यू; तुरुंगात खितपत पडलेला, पहिल्या हत्येनंतर मुंबईला पळालेला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथे सोमवारी एका ३९ वर्षीय महिला फिजिओथेरपिस्टने आधी आईची हत्या केली, नंतर मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून पोलीस ठाणे गाठले. सुटकेसमध्ये मृतदेह पाहून पोलिसांचेही कान उभे राहिले. ही घटना बंगळुरूमधील एका निवासी अपार्टमेंटमधील आहे. सेनाली सेन असे आरोपी महिलेचे नाव आहे.

सेन आणि त्यांच्या आईमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. काही वेळातच परिस्थिती इतकी वाढली की रागाच्या भरात महिला फिजिओथेरपिस्टने आईचीच हत्या केली. महिला फिजिओथेरपिस्टने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने सांगितले की त्याची आई आणि त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे.

पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. महिलेविरुद्ध भादंवि कलम ३०२ व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्या सुटकेसचा व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये मृतदेह भरून महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती.

पोलिसांनी महिलेची चौकशी सुरू केली. यात आरोपी महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे आणि सध्या ती तिच्या आईसोबत बेंगळुरू येथे एका फ्लॅटमध्ये राहत होती. आरोपी विवाहित असून घटनेच्या वेळी तिचा पती घरी नव्हता. घटनेच्या वेळी महिलेची सासूही तिथे हजर होती, पण सेनने एका खोलीत ही हत्या केल्याची माहिती समोर आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस