शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन अडचणीत, कोर्टाने दिले चौकशीचे आदेश, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:27 IST

लक्ष्य सेनने भारताला जागतिक स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवून दिली आहेत

Lakshya Sen Crime News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा अशा बड्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिलेला भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मोठ्या अडचणीत सापडला आहे. लक्ष्य सेन सध्या २३ वर्षांचा असून त्याचे प्रशिक्षक विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण आहेत. या खेळाडूने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत. लक्ष्यने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. त्याने थॉमस कपमध्येही सुवर्णपदक जिंकले. याशिवाय त्याने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तसेच युवा ऑलिंपिक स्पर्धेतही त्याच्या नावावर सुवर्णपदक आहे. पण आता वयचोरीच्या प्रकरणात कर्नाटकउच्च न्यायालयाने लक्ष्य सेनविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

आरोप काय? कोण-कोण सहभागी?

लक्ष्य सेनवर वय लपवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लक्ष्य सेनने ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले वय खोटे दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याचे कुटुंबीय आणि प्रशिक्षकही सहभागी आहेत. त्याच्या आईवडिलांनी आणि भावाने मिळून त्याचा जन्म दाखला बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्नाटकउच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

लक्ष्य सेनने कर्नाटक उच्च न्यायालयात त्याच्या विरोधात या प्रकरणी करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची मागणी केली होती, पण न्यायाधीश एमजी उमा यांनी त्या याचिका फेटाळून लावल्या. जर प्रथमदर्शनी गुन्ह्याकडे लक्ष वेधणारे पुरावे रेकॉर्डवर ठेवण्यात आले असतील तर तपास थांबवण्याचे किंवा फौजदारी कारवाईची सुरुवात रद्द करण्याचे कोणतेही कारण या प्रकरणात दिसत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे की तक्रारदाराने न्यायालयासमोर बरीच सामग्री सादर केली आहे, ज्यामध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत संबंधित अधिकाऱ्याकडून मिळालेल्या कागदपत्रांचाही समावेश आहे.

वय कसे लपवले?

लक्ष्य सेन विरुद्धच्या तक्रारीत असा आरोप आहे की लक्ष्य सेन आणि त्याच्या भावाचे वय लपवण्यात आले होते जेणेकरून ते २०१० पासून बॅडमिंटन स्पर्धांच्या ज्युनियर श्रेणीमध्ये खेळू शकतील. लक्ष्य सेनचे वय अडीच वर्षांनी कमी दाखण्यासाठी जन्म प्रमाणपत्रात छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. युवा व्यवहार मंत्रालयाच्या चौकशीत त्याच्या वडिलांना रेकॉर्डमध्ये छेडछाड केल्याबद्दल दोषी आढळल्याचा दावा केला जात आहे. आता हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयासमोर आहे, आता तपासातून काय निष्पन्न त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBadmintonBadmintonKarnatakकर्नाटकHigh Courtउच्च न्यायालय