कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. रिटायरमेंटला काहीच दिवस शिल्लक असताना एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली. ६० वर्षीय या अधिकाऱ्याचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
तुमकुरु जिल्ह्यातील पावगडा येथे ही घटना घडली आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मल्लिकार्जुन यांचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्याच कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन पुढच्याच आठवड्यात रिटायर होणार होते. परंतु, त्याआधीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला.
आत्महत्येपूर्वी मित्रांना पाठवला व्हिडीओ
पोलीस तपासात समोर आलं आहे की, मल्लिकार्जुन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना व्हॉट्सएपवर एक व्हिडीओ पाठवला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ते आत्महत्या करायला जात आहेत. त्यांनी आपले 'जॉईंट डायरेक्टर' कृष्णप्पा यांच्यावर सतत मानसिक छळ केल्याचा आणि दबाव टाकल्याचा आरोप केला. याच त्रासामुळे आपल्याला हे पाऊल उचलावं लागत असल्याचं मल्लिकार्जुन यांनी व्हिडिओत म्हटलं आहे.
"देव त्याला शिक्षा देईल"
व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन अत्यंत भावूक दिसले. ते म्हणाले की, "माझ्या कुटुंबाने मला नेहमीच साथ दिली, पण अधिकारी कृष्णप्पा यांनी खूप छळ केल्याने मी खचून गेलो. देव त्याला शिक्षा देईल, कायदाही त्याचा हिशोब करेल." तसेच आपल्या कुटुंबाने कोणाबद्दलही बदल्याची भावना ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. हा शेवटचा मेसेज आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा बनला आहे.
कुटुंबाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
मल्लिकार्जुन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पावगडा टाऊन पोलिसांनी जॉईंट डायरेक्टर कृष्णप्पा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, व्हायरल व्हिडीओ आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. ही घटना केवळ विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाचा गंभीर मुद्दाही अधोरेखित करते.
Web Summary : Karnataka official committed suicide, alleging mental harassment by a superior in a video message before death. He stated his superior drove him to the brink. Police investigate the joint director after a complaint was filed.
Web Summary : कर्नाटक में एक अधिकारी ने आत्महत्या की, मौत से पहले एक वीडियो संदेश में वरिष्ठ द्वारा मानसिक उत्पीड़न का आरोप लगाया। उन्होंने कहा कि उनके वरिष्ठ ने उन्हें मजबूर किया। शिकायत दर्ज होने के बाद पुलिस संयुक्त निदेशक की जांच कर रही है।