शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 15:26 IST

अवैध संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या.

Karnataka Crime:कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमकुरु येथे एका महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिला. पोलिसांना मृताच्या बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यावर शोध सुरू झाला. यादरम्यान मृताच्या घरात मिरची पावडर आणि झटापटीचे पुरावे आढळले. यानंतर संशयाची सुई पत्नीकडे वळाली. पोलिसांनी आपल्या पद्धतीने पत्नीची कसून चौकशी केली, त्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला.

डोळ्यात तिखट टाकून गळा आवळलामिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तिप्तूर तालुक्यातील कादशेट्टीहल्ली गावातील आहे. ५० वर्षीय शंकरमूर्ती असे मृताचे नाव असून, सुमंगल असे आरोपी पत्नीचे नाव आहे. महिलेचे नागराजू नावाच्या तरुणासोबत अवैध प्रेम संबंध होते. पतीला या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्याने विरोध केला. या विरोधामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुमंगलाने आधी पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली अन् त्याला लाकडी दांड्याने बेदम मारले. पती गंभीर जखमी झाल्यानंतर शेवटी त्याचा गळा पायाने दाबला, ज्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर सुमंगला हिने तिचा प्रियकर नागराजूसोबत मिळून मृतदेह एका पोत्यात भरला आणि सुमारे ३० किमी अंतरावरील विहिरीत फेकून दिला.  

पोलिस मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहोचलेशंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या घरात मिरची पावडरचे डाग आणि संघर्षाच्या खुणा दिसल्या. यामुळे पोलिसांना पत्नीवर संशय आला. पोलिसांनी सुमंगलाचे कॉल डिटेल रेकॉर्ड काढले, तेव्हा संशय अधिकच वाढला. कॉल डिटेल्सद्वारे हा कट उघडकीस आला. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस