शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गाडी हळू चालवायला सांगितली, संतापलेल्या तरुणाने 5 जणांना उडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:29 IST

आरोपी तरुणाने भरधाव वेगाने गाडी वरातीत घुसवली, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला

कर्नाल: हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात रविवारी एक मोठा अपघात घडला, यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ताने लग्नाची वरात जात होती. यावेळी वरातीमधील काही लोकांनी आरोपी तरुणाला गाडी सावकाश चालवण्यास सांगितले, या गोष्टीचा राग आलेल्या तरुणाने भरधाव गाडी वरातीत घुसवली, ज्यात दोघांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नालच्या नीलोखेडीमधील एका कॉलनीत लग्न सुरू होतं. यावेळी कॉलनीतील अजय नावाच्या तरुणाला वरातीमधील काही जणांना गाडी सावकाश चालवण्यास सांगितली. या गोष्टीचा राग आल्याने अजयने वेगाने गाडी वरातीत घुसवली. यादरम्यान त्याने पाच जणांना उडवलं. 

या धक्कादायक घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, इतर तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अजय आणि त्याच्या वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पाच पथकं तयार केली आहेत. 

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यू