शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत डोकावून माकड पुन्हा पुन्हा करत होते इशारा, लोकांनी जाऊन पाहिलं तर बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 12:03 IST

हीरामन पुरवामध्ये एका कोरड्या विहिरीत महिलेचा मृतदेह पडला होता. महिला त्याच परिसरात राहत होती, ती सकाळी शौचास बाहेर गेली होती. तेव्हापासून बेपत्ता होती. 

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माकडांनी विहिरीत पडलेला एक मृतदेह शोधून काढला. माकडांनी परिसरातील लोकांना इशारा करून करून विहिरीत पडलेल्या मृतदेहाची माहिती दिली. हीरामन पुरवामध्ये एका कोरड्या विहिरीत महिलेचा मृतदेह पडला होता. महिला त्याच परिसरात राहत होती, ती सकाळी शौचास बाहेर गेली होती. तेव्हापासून बेपत्ता होती. 

परिसरातील गोपाल सिंह चौहान यांनी सांगितलं की, पुन्हा पुन्हा दोन ते तीन माकड येत होते आणि विहीरीवर बसून आत जात होते आणि  मग लोकांकडे बघत होते. हे एकदा नाही तर अनेकदा त्यांनी केलं. तेव्हा गोपाल सिंह चौहान इतर लोकांना घेऊन विहिरीवर गेले. त्यांना वाटलं की, कदाचित माकडाचं पिल्लू पडलं असेल ज्यामुळे ते असं करत असतील. (हे पण वाचा : तीनवेळा लग्न केलं, तिसऱ्यांदा संसार मोडला; माहेरी आली अन् खुर्चीवर बसलेल्या वडीलांची हत्या केली)

गोपाल सिंह चौहान म्हणाले की, जेव्हा आम्ही विहिरीत पाहिलं तर आम्हाला धक्का बसला. आम्हाला दिसलं की, परिसरातच राहणारी महिला राधा देवी कश्यपचा मृतदेह विहिरीत पडला आहे. मृतदेह दिसल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं आणि त्यांनी ६ तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

याप्रकरणी एसीपीसी सीसामऊ म्हणाले की, महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. महिला तिच्या मुलीच्या शाळेच्या अॅडमिशनमुळे चिंतेत होती. असा अंदाज आहे की,  तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असेल. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी