शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! लग्नात आलेल्या महिलेला पाहून नवरदेव नवरीला घेऊन पळाला, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:00 IST

Uttar Pradesh : कुटुंबियांना जेव्हा याची खबर लागली तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलिसही दोघांचा बराचवेळ शोध घेत राहिले, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कन्नौज येथील छिबरामऊ नगरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी सायंकाळी अजब घटना बघायला मिळाली. इथे सुरू असलेल्या एका लग्नात एक महिला पोहोचली. या महिलेला बघून नवरदेव मंडपातून पळून गेला. आश्चर्याची बाब म्हणजे तो नवरीलाही सोबत घेऊन पळाला. कुटुंबियांना जेव्हा याची खबर लागली तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलिसही दोघांचा बराचवेळ शोध घेत राहिले, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, लग्न समारंभात अचानक आलेली ही महिला नवरदेवाची पहिली पत्नी होती. ती शेजारच्याच गावात राहत होती. लग्नानंतर काही महिन्यांनीच तरूणाने तिला सोडलं होतं. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला तिला महिन्याचा खर्च देण्याचा आदेश दिला होता. महिलेनुसार, कोर्टाच्या आदेशानंतरही तिला एकही रूपया मिळाला नाही. अशात जेव्हा तिला या लग्नाबाबत समजलं तेव्हा ती आधी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिथून पोलिसांसोबत लग्नात पोहोचली होती.

आपल्या पहिल्या पत्नीला बघताच नवरदेव लग्न मंडपातून नवरीला सोबत घेऊन फरार झाला. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाही तर अखेर महिलेने पोलिसात तक्रार दिली. तसेच यावेळी हेही समोर आलं की, तरूणाचं हे तिसरं लग्न होत होतं. पहिल्या पत्नीला सोडल्यानंतर त्याने आणखी एका महिलेसोबत लग्न केलं होतं. पण काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबियांनी तरूणावर केसही केली होती. तो तुरूंगातही गेला होता.

तुरूंगातच त्याची भेट कनौज गावातील एका व्यक्तीसोबत झाली होती. दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता. ज्यानंतर त्याने आपल्या भाचीसोबत या तरूणाचं लग्न ठरवलं होतं. शनिवारी लग्न समारंभ सुरू होता. यादरम्यान नवरदेव नवरीला पार्लरमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने दोन-तीन महिलांना सोबत घेऊन गाडीतून गेला. त्याने महिलांना रस्त्यात मधेच उतरून दिलं आणि त्यानंतर नवरी परत आली नाही. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न